पुणे : सध्या कोरोना बाधितांची दिवसें दिवस वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत आहे. तरीदेखील बाधितांची संख्या वाढतच आहे. लॉकडाउनचे काही नियम शिथिल झाल्याने नागरिकांचा नियमित प्रवास पूर्ववत होत आहे. परंतु, यामध्ये आता अधिक सतर्कतेने काळजी घेणे गरजेचे बनले आहे. अनेक ठिकाणी रेड झोनमधील व्यक्ती भीतीपोटी आपल्या ग्रीन झोन किंवा ऑरेंज झोनमधील नातेवाइकांकडे लपूनछपून जात आहेत. त्यामुळे कोरोनापासून थोडं दूर असलेल्या शहरातील इतर भागामध्ये तसेच शहराच्या जवळील ग्रामीण भागामध्येही कोरोना आपले पसरत पाय पसरण्याची शक्यता आहे.
नुकतेच रेडझोन मधून एक महिला भाजीपाल्याच्या वाहनातून लपून तिच्या सुनेसह दोन नातवंडांना घेऊन डोणज्यात गेली. तिथे तिला अस्वस्थ वाटू लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल केले असता तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तिच्या संपर्कातील गावातील इतर लोकांना क्वारंटाइन करण्यात आले. शहरातील काही भाग कोरोनामुक्त झाले आहेत. परंतु, अशा लपूनछपून ग्रीन झोन किंवा ऑरेंजमध्ये जाणाऱ्या लोकांमुळे कोरोना पुन्हा डोकंवर काढत आहे. कोरोनामुक्त होऊन ग्रीन झोनचा मान पटकावणाऱ्या औंधमध्ये काल कोरोना बाधित रुग्ण आढळला. कोरोनाचा शिरकाव आपल्या भागात होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिक काळजी घेत आहे. तरीदेखील काही चुकांमुळे कोरोना पसरण्याची भीती आहे.
रेड झोनमधील व्यक्ती आपल्या आजूबाजूला कोरोना बाधित सापडत असल्याने पुरते धास्तावले आहेत. त्यात रेडझोनमध्ये असणाऱ्या कडक नियमांमुळेही लोकांचा आता संयम सुटत आहे. त्यामुळे काहीजण हवापालट करण्यासाठी आपल्या नातेवाइकांकडे जात आहे. परंतु या सगळ्यात ते आपला धोका आपण इतरांपर्यंत पोहचण्याची शक्याता आहे हे विसरत आहेत. शहरातील रेडझोनमधील घरांना सध्या चक्क कुलपं लागली जात असल्याचे चित्र आहे. नातेवाइकांकडे जाणाऱ्या व्यक्ती कोरोना बाधित असतील तर सगळाच कारभार रामभरोसे असे चित्र निर्माण होण्याची भीती ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील नागरिक करत व्यक्त करत आहेत.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी- क्लिक करा
लाकडाउनचे नियम शिथिल झाल्याने अनेक जण कामानिमित्त एका भागातून दुसऱ्या भागात जात आहेत. तसेच शहर पूर्ववत होत असताना सोशल डिस्टन्सिंगचाही पुरता फज्जा उडत आहे. काही नागरिक मास्क वापरण्याचे टाळतात. या सगळ्याचा परिणाम म्हणजे भविष्यात जर कोरोनाचे संकट अधिक वाढले तर या सगळ्या बाजू कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.