बारामती : शहरातील तांदुळवाडी भागात आणखी एक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्याने पुन्हा एकदा बारामती परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची व्यक्ती ही कंपनी कर्मचारी असून, आईच्या अंत्यविधीसाठी पुण्याला गेलेली होती. पुण्याहून 21 मे रोजी बारामतीत सदर व्यक्ती आल्यानंतर लगेच रुई रुग्णालयांमध्ये तिची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये सदर व्यक्तीला कोरोना लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
बारामती शहर व तालुक्यातील मिळून हा तेरावा रुग्ण असून, यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तर सात जण बरे झाले आहेत. चार जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, यानंतर प्रशासनाने अधिक खबरदारी घेण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. पुणे व मुंबईहून येणारी माणसे ही बारामतीकरांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची बाब पुन्हा एकदा सिद्ध झालेली आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
परगाव किंवा परराज्यातून येणाऱ्या प्रत्येकाची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. आपल्या शेजारी येणाऱ्या परराज्यातील किंवा परगावातील व्यक्तींची माहिती लोकांनी देखील प्रशासनाला कळवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.