महाळुंगे पडवळ (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील चास येथे कोरोना रुग्णांची संख्या ११ वर पोहोचली आहे. त्यातच चास आरोग्य पथकातील शिपायाला कोरोनाची लागण झाल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ग्रामस्थांकडून कंटेनमेंट झोनच्या नियमांचे पालन केले जात नाही. वेळोवेळी हात धुवून मास्क व सॅनिटायझरचा वापरही केला जात नाही. तसेच, वैयक्तीक खबरदारी घेण्याबाबत दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रुग्ण संख्येपुढे आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायतीचे कर्मचारी हतबल झाली आहे.
आळंदीत चोर पावलांनी वशिल्याचे माउली दर्शन
चास- राजेवाडी येथे पती, पत्नी व एक लहान मुलगा मुंबईहून चास येथे आले होते. पती एका पतसंस्थेत पनवेल येथे कामाला होता. तेथील अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने पनवेलहून ते गावी आले होते. पती, पत्नी व मुलगा, अशा तिघांना प्रथम लागण झाली होती. उपचार घेतल्यानंतर ते कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर काही दिवस गाव कोरोनामुक्त होते. जुलै महिन्यात रुग्ण संख्या वाढत गेली. ग्रामपंचायत कार्यालय, चास आरोग्य पथक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक, पोलिस पाटील, घोडेगाव पोलिस ठाणे आदी कार्यालयामार्फत गावात विविध उपाय योजना केल्या जात आहेत. परंतू रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे.
‘‘कोरोना रुग्णाच्या संपर्काबाबत संबंधितांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना व्यवस्थित माहिती दिली जात नाही. राजेवाडी, तोडकरवस्ती, कडेवाडी, गावठाण येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. ११ कोरोना रुग्णांपैकी १ जण ससून हॉस्पिटल पुणे व सात जण अवसरी खुर्द येथील इंजिनिअरींग कॉलेजमध्ये तयार केलेल्या कोरोना रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर, ३ जण बरे होऊन घरी परतले आहेत,’’ अशी माहिती आरोग्य सहायक डॉ. भास्कर साबळे व दत्तात्रेय भागवत यांनी दिली.
‘‘नागरिकांकडून कंटेनमेंटझोनच्या नियमांचे पालन केले जात नाही. वेळोवेळी हात धुवून मास्क व सॅनिटायझरचा वापरही पुरेशा प्रमाणात केला जात नाही. वैयक्तीक खबरदारी घेण्याचे कटाक्षणाने टाळले जात आहे. त्यामुळे रुग्ण संख्येत वाढ होत आहे,’’ असे महाळुंगे पडवळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी गिते यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.