corona second wave Compared Currently the severity of the infection is low sakal
पुणे

पुणे : दुसऱ्या लाटेच्या तुलनेत सध्या संसर्गाची तीव्रता कमी

दुसऱ्या लाटेच्या तुलनेत सद्यःस्थिती; अत्यवस्थ रुग्णही अत्यल्प

प्रमोद दंडगव्हाळ: सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असली, तरी अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. तसेच ऑक्सिजन व व्हेंटिलेटर लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दुसऱ्या लाटेच्या तुलनेत सध्या नगण्य आहे. यामुळे पुणेकरांना घाबरून जाऊ नये, लसीकरण हे कोरोनावरील प्रभावी अस्त्र असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.(corona second wave)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात संसर्गाचा दर २३.९ टक्के होता. तोच दर आता २९.५ टक्के आहे. दुसऱ्या लाटेपेक्षा सध्या संसर्गाचा दर अधिक आहे. मात्र, दुसऱ्या लाटेत ऑक्‍सिजनवरील रुग्णांची संख्या १४.१ टक्के होती. ती आता अवघी ०.५८ टक्के आहे. व्हेंटिलेटरची आवश्‍यकता भासणाऱ्या रुग्णांची संख्या त्यावेळी १.८ टक्के होती. ती आता ०.०१ टक्के इतकी कमी झाली आहे. कोरोना संसर्गाचा वेग जास्त असला, तरी परिस्थिती धोकादायक नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. लसीकरणामुळे कोरोना संसर्गाची तीव्रता कमी असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांना रुग्णालयांत दाखल होण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली होती.

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत गेल्या ७ एप्रिल रोजी दैनंदिन रुग्णांची संख्या ९ हजार ६२१, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ९६ हजार ५१६ इतकी होती. यातील ६४ हजार ४८३ रुग्ण (६६.८ टक्के) गृहविलगीकरणात होते. तर सध्या (१९ जानेवारीपर्यंत) दैनंदिन रुग्णांची संख्या १२ हजार ३२४, तर सक्रिय रुग्णांची संख्या ७१ हजार ४९७ इतकी आहे. यातील ६९ हजार १६७ रुग्ण (९६.७ टक्के) गृहविलगीकरणात आहेत. गेल्या ७ एप्रिल रोजी जिल्ह्यात लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या २२ लाख ८३ हजार ५१६ इतकी होती. तर ही संख्या आता १ कोटी ५९ लाख ४१ हजार ६७९ इतकी झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ऑक्सिजनची मागणी कमी

दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक असल्याने रुग्णांना ऑक्‍सिजनची गरज मोठ्या प्रमाणावर भासली होती. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडाही निर्माण झाला होता. त्यावेळी दैनंदिन ऑक्सिजनची मागणी ३४१ मेट्रिक टनापर्यंत गेली होती. मात्र, सध्या ऑक्‍सिजनवरील रुग्णांची संख्या कमी असून मागणीही ९० मेट्रिक टन इतकी असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही

SCROLL FOR NEXT