पुणे : पुणे शहरातील कोरोना नियंत्रित होत असल्याचे गेल्या तीन महिन्यांतील आकडेवारीवरून समोर आले आहे. बाधितांची संख्येबरोबरच मृत्यूदर ही कमी होत असल्याचे दिसून आहे. पुढील आठवड्यापर्यंत परिस्थिती आटोक्यात येईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.
फेब्रुवारीपासून पुणे शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाट पसरू लागली. मात्र, या महिन्यात बाधितांची संख्या कमी होती. मात्र मृत्यूदर जास्त होता. मार्च महिन्यात झपाट्याने रुग्णांची संख्या वाढली. तर एप्रिल महिन्यात रुग्णांची संख्या दररोज काही हजारांनी वाढत असल्याचे दिसून आले. मात्र, मे महिन्यात बाधितांची संख्या वाढली असली, तरी बरे होण्याच्या संख्येत देखील वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. तर मृत्यूदर देखील कमी झाला असल्याचे समोर आले आहे.
पुणे जिल्ह्यातील तीन महिन्यातील पहिल्या आठवड्याची स्थिती
तपशील : पुणे शहर (टक्केवारी) : जिल्हा (टक्केवारी)
बाधित होण्याचा दर १७.४७ : १७.४६
बरे होण्याचा दर ९४.४४ : ९४.४६
मृत्यू दर २.४२ : २.२१
तपशील : पुणे शहर (टक्केवारी) : जिल्हा (टक्केवारी)
बाधित होण्याचा दर १९ : १९.५३
बरे होण्याचा दर ८२.५३ : ८३.७८
मृत्यू दर १.८४ : १.६९
तपशील : पुणे शहर (टक्केवारी) : जिल्हा (टक्केवारी)
बाधित होण्याचा दर १९.७४ : २०.८७
बरे होण्याचा दर ८९.२६ : ८७.५४
मृत्यू दर १.६६ : १.५६
पुण्यात कोरोना नियंत्रणात
- मार्च महिन्यात बाधितांचा दर कमी होता. तो एप्रिल आणि मे महिन्यात वाढला
- कोरोनातून बरे होण्याचा दर मार्च महिन्यात सर्वाधिक होता. तो एप्रिलमध्ये कमी झाला. मात्र, मे महिन्याच्या सुरवातीस पुन्हा वाढला
- मृत्यूच्या दरात मात्र सलग तीन महिने घट होत आहे. मार्च मध्ये तो तब्बल २. ४२ होता. तो मे महिन्यात १. ६६ पर्यंत कमी झाला आहे
- पुणे शहरात गुरुवारपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या ३९ हजार ७३२ एवढी आहे. तर पुण्यासह संपूर्ण जिल्ह्यात ९६ हजार ६८५ एवढी रूग्ण संख्या आहे
''महापालिकेने केलेल्या विविध उपयोजनांमुळे पुणे शहरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत आहे. बाधितांची संख्या आणि मृत्यू दर देखील कमी झाला आहे. तो आणखी कमी करण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न होत आहे. सातत्याने त्यावर महापालिकेकडून नियंत्रण ठेवले जात आहे. येत्या आठवडाभरात ही संख्या आणखी कमी होण्यास मदत होईल.''
- पुणे महापालिका (वरिष्ठ अधिकारी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.