पुणे - पुण्यामध्ये मिनी लॉकडाऊन करण्यात आल्यानंतरही कोरोनाचा कहर सुरुच आहे. गेल्या काही दिवसांमध्ये 24 तासात 10 हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात सापडत आहेत. पुण्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असतानाही वाढणारी ही आकडेवारी चिंताजनक अशीच आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या बुधवारी ८४ हजार ५२६ झाली आहे. यापैकी १९ हजार ९०७ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. उर्वरित ६४ हजार ६१९ गृह विलगीकरणात आहेत. जिल्ह्यात आज दहा हजार ९०७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण रुग्णांत पुणे शहरातील ५ हजार ६५१ रुग्ण आहेत.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील ६२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरातील एकूण मृत्यूंमध्ये शहरातील सर्वाधिक ४१ मृत्यू आहेत. दिवसभरात ७ हजार ८३२ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण कोरोनामुक्त रुग्णांमध्ये पुणे शहरातील ४ हजार ३६११, पिंपरी चिंचवडमधील २ हजार २५७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ७०४, नगरपालिका हद्दीतील ४६२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ४८ रुग्ण आहेत.
आज शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये २ हजार ७८४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार ७९१, नगरपालिका क्षेत्रात ५५३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १४८ रुग्ण सापडले आहेत. दिवसभरातील एकूण मृत्यूमध्ये पिंपरी चिंचवडमधील १२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील पाच आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील चार मृत्यू आहेत. आज नगरपालिका हद्दीत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
सद्यःस्थितीत विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ६ हजार ५५६, पिंपरी चिंचवडमधील ४ हजार ११३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६ हजार २४१, नगरपालिका हद्दीतील २ हजार ४४४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ५५३ रुग्ण आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.