पुणे Coronavirus : कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगापुढं आव्हान उभं केलंय. महाराष्ट्रात त्याचे रुग्ण सर्वाधिक आहेत. त्यामुळंच आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे. आता खबरदारी घ्यायची म्हणजे काय? तर घरी थांबायचं. अनावश्यक कामांसाठी बाहेर पडायचं नाही. स्वच्छता बाळगायची आणि स्वतःला या व्हायरसपासून वाचवायचं. हीच खरी लढाई आहे. या लढाईमध्ये सकाळ माध्यम समूह तुमच्या सोबत आहे.
कंटाळला असालच
गेल्या दोन आठवड्यांपासून पुणे, मुंबई, नवी मुंबई, नागपूर यांसारख्या महानगरांमध्ये कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची घोषणा केलीय. दिवसभर घरातूनच काम करायचं. पुण्यात सध्या बहुतांश मनुष्यबळ घरातून काम करत आहेत. लॅपटॉप, डेस्कटॉप, वायफायची सुविधा करण्यात आलीय. मुळात माणूस हा समाजप्रीय प्राणी असल्याचं म्हटलं जातं. घरात बसला तर तो, कंटाळणारच ना! तुम्हीही गेल्या काही दिवसांपासून घरात बसून कंटाळला असालच किंवा येत्या काही दिवसांत तुम्हाला आणखी काही काळ घरात बसावं लागण्याचाही शक्यता आहे. त्यामुळं असा कंटाळा आल्यानंतर करायचं काय? यासाठी सकाळ माध्यम समूह तुमच्यासाठी एक सरप्राईज घेऊन येत आहे.
कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
या अभिनेत्री आपल्यासोबत
सकाळ माध्यम समूहासोबत आपले मराठी सेलिब्रेटीदेखील आहेत. यात सोनाली कुलकर्णी, स्मिता गोंदकर, मानसी नाईक, उर्मिला कानेटकर, मृण्मयी कोलवलकर, रेशम टीपणीस, स्पृहा जोशी, सई ताम्हणकर, पूजा सावंत आणि अमृता खानवीलकर या सहभागी होणार आहेत. या सरप्राईजमध्ये महिलांपासून बच्चे कंपनीपर्यंत सर्वांसाठी सर्वकाही असणार आहे. हे सरप्राईज जाणून घेण्यासाठी सकाळला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा.
Twitter - @SakalMediaNews
Facebook - @SakalNews
Instagram - sakalmedia
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.