पुणे

पालिकेपुढे ‘टॉप टेन’चे आव्हान

पीतांबर लोहार

पिंपरी -  स्वच्छ भारत अभियानाचे दोन ऑक्‍टोबरपासून चौथे वर्ष सुरू होत आहे. पहिल्या वर्षी देशात पहिल्या दहा शहरांत स्थान पटकाविलेले पिंपरी-चिंचवड थेट ७२व्या स्थानावर फेकले गेले. त्यात थोडी फार सुधारणा केलेल्या शहराला तिसऱ्या म्हणजे चालू वर्षी ४३ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. आगामी २०१८-२०१९ या वर्षात पहिल्या दहामध्ये स्थान मिळविण्याचे आव्हान शहरासमोर आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेची धडपड सुरू आहे. 

स्वच्छ भारत अभियानात पहिल्याच वर्षी शहराचा समावेश झाला होता. मात्र त्यानंतर सलग दोन वर्षे ‘टॉप टेन’ने शहराला हुलकावणी दिली. आता २०१९ साठी स्वच्छ सर्वेक्षण मोहीम जाहीर केली आहे. 

पहिल्या दहामध्ये क्रमांक येण्यासाठी शहरातील शंभर टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेची धडपड सुरू आहे. त्यासाठी निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. हागणदारीमुक्तीसाठी सुमारे ८० टक्के वैयक्तिक शौचालये उभारली आहेत.

नागरिकांनी घरातील कचऱ्याचे वर्गीकरण किंवा विलगीकरण स्वतःच करावे. आरोग्यविषयक तक्रारी करण्यासाठी स्वच्छ भारत ॲप डाउनलोड करून घ्यावे. तसेच, स्वच्छ भारत मंच केंद्र सरकारने सुरू केला आहे. त्यावरही नागरिक स्वच्छतेबाबत मत व्यक्त करून शकतात. सूचना व संकल्पना मांडू शकतात.
- दिलीप गावडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hitendra Thakur: एका मताच्या जोरावर विलासराव देशमुखांचं सरकार तारणारे हितेंद्र ठाकूर; बदल्यात काय घेतलं होतं?

Anil Deshmukh : तुम्ही दगड मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, आणि तुम्हाला सोडणारही नाही

Mohol News : मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न, पोलीसात तक्रार दाखल, दोघेजण ताब्यात

Kalyna Rural Assembly Election : तोतया पोलिसांची ग्रामीण मध्ये दहशत! कल्याण ग्रामीण मधील मनसेची शाखा बंद केली

Manipur Government : मणिपूरचे राज्य सरकार अल्पमतात? ‘एनपीपी’ने पाठिंबा काढून घेतल्यानंतर काँग्रेस पक्षाचा दावा

SCROLL FOR NEXT