Migrant_Workers 
पुणे

स्थलांतरित कामगार होणार 'टेन्शन फ्री'; कामगार विभागानं घेतला 'हा' निर्णय!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आपल्या गावी कसे जायचे? कामाच्या ठिकाणी झालेला त्रास कसा सोडवायचा? मजुरीचे पैसे अडकले असतील, तर ते कसे मिळवायचे? यासह कोरोनाच्या परिस्थितीमुळे नैराशेच्या गर्तेत अडकले असतील, तर काय करायचं? अशा अनेक शंकांचे निरसन करण्यासाठी आता स्थलांतरित कामगारांना कामगार विभागामार्फत समुपदेशन करण्यात येणार आहे.

याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो रिट पिटीशन दाखल केली होती. त्यानुसार स्थलांतरित कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला दिले आहेत. आदेशानंतर पंधरा दिवसांतच याबाबत कार्यवाही करा, असे सूचना याबाबच्या आदेशात करण्यात आली होती.

त्यानुसार हे केंद्र स्थापन करण्यात आले असून स्थलांतरित कामगारांना त्यांच्या विविध शंकाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्याबाबत समुपदेशन करण्याचे काम या केंद्राच्या माध्यमातून करण्यात येईल. यासह राज्य शासनाच्या विविध योजनांची देखील माहिती त्याठिकाणी दिली जाणार आहे. त्यामुळे विविध चिंतांनी ग्रस्त असलेले कामगार केंद्रात गेल्यानंतर निर्धास्त होतील, अशी खबरदारी केंद्राच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. 

लॉकडाऊन काळात रोजगार थांबल्याने कामगार आणि मजूर कामगार वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. आर्थिक अडचणी निर्माण झाल्याने कुटुंबासह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच जिल्ह्यात घडली आहे. कामगारांच्या अडचणी लक्षात घेऊन शहरातील काही सामाजिक संस्था आणि क्रेडाई  या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेद्वारे त्यांना समुपदेशन करण्यात येत आहे. मात्र आता शासकीय पातळीवर देखील कामगारांचे मनोबल वाढवले जाणार आहे.

या ठिकाणी आहे केंद्र : 
स्थलांतरितांना समुपदेशन करण्यासाठी येथील अप्पर कामगार आयुक्त कार्यालयात केंद्र सुरू करण्यात आले आहे. पुणे-मुंबई रस्त्यावर वाकडेवाडी येथे असलेल्या बंगला नंबर पाचमध्ये संबंधित कार्यालय आहे. सहाय्यक कामगार आयुक्त अभय गीते यांची त्याठिकाणी केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या कामगारांना त्यांच्या गावी जाण्यापासून अडवण्यात येणार नाही. मात्र कामाचे पैसे मिळाले नाही का? येथे राहण्या-खाण्याची सोय होत नाही का? किंवा इतर कोणत्या अडचणी आहेत याची विचारणा त्यांच्याकडे केली जाईल व अडचण सोडवण्यात येईल. ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याचे मार्गदर्शनही केले जाणार आहे.
- शैलेश पोळ, अप्पर कामगार आयुक्त

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Puja Khedkar: पूजा खेडकर प्रकरणात आज निर्णय; अटक होणार की पुन्हा संरक्षण मिळणार?

Mohammad Nabi: अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी घेणार निवृत्ती, 'ही' टूर्नामेंट असेल शेवटची

Chhagan Bhujbal: 'ईडीपासून मुक्ती मिळावी, यासाठी भाजपसोबत गेलो' भुजबळांचा खुलासा; राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात दावा

निवडणुकीत मोलाची कामगिरी; Donald Trump यांचं 'त्या' महिलेला मोठं बक्षीस, White House Chief of Staff म्हणून नियुक्ती

Gold Price Today: गुंतवणुकीची सुवर्ण संधी! सोने 2000 रुपयांनी झाले स्वस्त; भावात मोठी घसरण का झाली?

SCROLL FOR NEXT