Shekaru Esakal
पुणे

भीमाशंकर अभयारण्यात शेकरूंची गणना

सकाळ वृत्तसेवा

फुलवडे शिनोली : भीमाशंकर अभयारण्यात शेकरूंची(Ratufa indica,Indian giant squirrel) गणना आजपासून केली जाणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही गणना वन कर्मचारी करणार असून यामध्ये कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीला सहभाग घेता येणार नाही. ज्या कर्मचाऱ्यांना कोविडची लक्षणे आहेत. त्यांना यामध्ये सहभागी केले जाणार नाही. त्याचप्रमाणे गणनेत कोणताही प्राणी हाताळला जाणार नसल्याची माहिती पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी दिली. (Counting of Indian giant squirrel in Bhimashankar Sanctuary)

भीमाशंकर अभयारण्यात ही गणना जीपीएस व जिओ टॅग मॅपवर नोंदी करून करण्यासाठी वन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पावसाळा सुरू होण्याअगोदर शेकरू घरटी बनवितात. त्यामुळे मे व जून महिन्यात शेकरूंची गणना केली जाते. अभयारण्यात असलेल्या १९ बिटांमध्ये ही गणना होणार आहे. ज्या झाडावर शेकरू आहे. त्या झाडाखाली उभे राहून जीपीएसमध्ये नोंद घेतली जाते. या नोंदीत दिनांक, शेकरूंचे घरटे असलेले ठिकाण, घरटे असलेल्या झाडाचे नाव, घरटे जुने की नवे, सोडून दिलेले घरटे, पिल्लांचे घरटे, वेळ, घरट्याच्या जवळ शेकरू दिसल्यास त्याचे वर्णन, अक्षांश रेखांश, घरट्याचा आकार, घरट्यांची संख्या अशा प्रकारे नोंदी घेतल्या जातात. शेकरूंवर अभ्यास केलेल्या संशोधिका रिनी बार्जेस यांनी दिलेल्या माहितीचा उपयोग गणनेसाठी करण्यात येणार आहे.

शेकरूंची गणना शास्त्रीय पद्धतीने होणार असून यातून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग जंगलातील पुढील नियोजनासाठी होणार आहे. गणनेत कोणताही प्राणी हाताळण्यात येणार नसल्याचे गणना प्रशिक्षक व सेवानिवृत्त सहाय्यक वनरक्षक एस. वाय. जगताप यांनी सांगितले.

Indian giant squirrel

...म्हणून शेकरूंना ‘भीमाशंकरी’ नावाने संबोधतात

भीमाशंकर अभयारण्यात आढळणारे शेकरू हे वरच्या बाजूने करड्या रंगाचे व त्याचा पोटाचा भाग हा पांढऱ्या रंगाचा असतो. प्रत्येक शेकरू हे दिसायला वेगळे असून हा प्राणी एकट्याने झाडावर राहून प्रामुख्याने फळे खाणारा तसेच बीज, झाडाची फुले, फळे व साल खाणारा प्राणी आहे. शेकरूंचे आयुष्य 8 ते 9 वर्षाचे असते. शेकरू वर्षातून एकदा एका बछड्याला जन्म देत असतो. एक मादी दरवर्षी प्रजनन करेल असे नाही. त्यामुळे शेकरूंची संख्या झपाट्याने वाढत नाही. सर्प व गरुड शेकरूंची शिकार करतात. भीमाशंकरचे अभयारण्य शेकरूंसाठी प्रसिद्ध असल्याने स्थानिक नागरिक शेकरूंना ‘भीमाशंकरी’ या नावाने संबोधतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT