पुणे : दारु विक्रीचा परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवुन बनावट परवाना देत एका नागरीकाची तब्बल 40 लाख 43 हजार रुपयांची फसवणुक करणाऱ्या दाम्पत्याला शिवाजीनगर पोलिसांनी उत्तर प्रदेशातुन अटक केली. सरकारी अधिकारी असल्याचे भासवुन दाम्पत्य नागरीकांची फसवणुक करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.(Couple arrested for cheating Rs 40 lakh pretense of getting liquor license)
शुभम दुर्गेश गौर (वय 34, किडवाई नगर, कानपुर, उत्तर प्रदेश) व त्याची पत्नी रंजना शुभम गौर (वय 31) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या नागरीकास गौर याने आपण एनटीसी दिल्लीतील सरकारी कार्यालयात सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत आहोत, असे सांगून त्यांना बनावट ओळखपत्र दाखवुन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना दारु विक्रीचा परवाना मिळवुन देतो, असे सांगून वेळोवेळी त्यांच्याकडून ऑनलाईन व रोख अशा स्वरुपात 40 लाख 43 हजार रुपयांची रक्कम घेतली. त्याबदल्यात त्याने फिर्यादीस "मेर्स सयुरी वाईन ऍन्ड कंपनी' नावाचे बनावट दारु विक्री परवान्याची प्रत दिली. फिर्यादीने संबंधित परवान्याची चौकशी केली, तेव्हा तो परवाना बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्याच्याकडे पैसे मागूनही त्याने प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांनी पोलिसात फिर्याद दिली.(Pune Police)
या प्रकरणाचा शिवाजीनगर पोलिसांकडून तपास सुरु होता. शुभम व रंजना हे दोघेही वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने त्यांच्यापर्यंत पोचणे पोलिसांना जिकीरीचे ठरत होते. दरम्यान, तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर तसेच खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरुन, संबंधित आरोपी उत्तर प्रदेशातील कानपुर येथे असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिता मोरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनानुसार, पोलिस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर, महिला पोलिस उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे, पोलिस हवालदार कांतीलाल गुंड, रुपेश वाघमारे व पुनम बनकर हे रेल्वेने कानपुर येथे गेले. तेथुन त्यांनी गौर दाम्पत्यास बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून अलिशान फोर्ड इंडिव्हर कार, दोन मोबाईल व लॅपटॉप जप्त केले. त्यानंतर त्यांना अटक करुन पुण्याला आणण्यात आले.(Pune latest news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.