Covaxin Sakal
पुणे

पुणे : कोव्हॅक्सिन लशीचे १०००० डोस बुधवारी उपलब्ध

कोव्हॅक्सिन लशीची मागणी वाढली आहे. पण, त्या प्रमाणात लशीचा पुरवठा होत नाही. त्यामुळे पुण्यात लशीचा खडखडाट झाला होता.

सकाळ वृत्तसेवा

कोव्हॅक्सिन लशीची मागणी वाढली आहे. पण, त्या प्रमाणात लशीचा पुरवठा होत नाही. त्यामुळे पुण्यात लशीचा खडखडाट झाला होता.

पुणे - कोव्हॅक्सिन लशीचा (Covaxin Vaccine) तुटवडा निर्माण झाल्याने मंगळवारी शहरात हे लसीकरण बंद (Vaccination Close) ठेवण्यात आले होते. मात्र, महापालिकेला राज्याकडून दहा हजार लशीचे डोस (Dose) मिळाले असल्याने बुधवारी (ता. १६) ५४ केंद्रांवर लसीकरण होणार आहे.

कोव्हॅक्सिन लशीची मागणी वाढली आहे. पण, त्या प्रमाणात लशीचा पुरवठा होत नाही. त्यामुळे पुण्यात लशीचा खडखडाट झाला होता. त्याचा थेट परिणाम कोव्हॅक्सिनची लसीकरण केंद्र बंद करावी लागली. केंद्र सरकारने तीन लाख डोस राज्य सरकारला दिले. त्यापैकी पुणे महापालिकेसाठी दहा हजार लशीचे वितरण करण्यात आले. त्यामुळे बुधवारी लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध होईल, असे महापालिका प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.

पुण्यात बुधवारी एकूण ५४ केंद्रांवर ८ हजार १०० डोस उपलब्ध करून दिले आहेत. त्यामध्ये ६० वर्षे आणि त्यापुढील वयोगटासाठी ११ ठिकाणी, १५ ते १८ वयोगटातील ४० महापालिकेचे आणि तीन सरकारी असे ४३ ठिकाणी लसीकरण उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्वच ठिकाणी प्रत्येकी १५० डोस उपलब्ध करून देण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

दोन तीन दिवसानंतर पुढे काय?

कोव्हॅक्सिन लसीचा एकूणच तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुरेशा लसी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे कोव्हॅक्सिन लशीच्या केंद्रांची संख्या १८० वरून आता केवळ ४०-४५ केंद्रांपर्यंत कमी झाली. सुरुवातीला एका केंद्रावर ५०० डोस ठेवण्यात येत होते. आता ही संख्या १०० ते १५० डोसपर्यंत कमी करावी लागली आहे. कोव्हॅक्सिनचा पुरवठा झालेली लस पुढील एक ते दोन दिवस पुरेल. त्यानंतर पुन्हा काय, असा प्रश्न सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना पडला आहे.

कोविड सेंटरमधील कर्मचारी कार्यमुक्त

शहरातील कोरोना उद्रेक कमी झाल्याने गेल्या अडीच वर्षांपासून कोविड सेंटरवर कार्यरत कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ कार्यस्थळी पाठविण्यात येणार आहे. त्या बाबतचे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिले. शहरात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी रुग्णालये कमी पडू लागली. त्यासाठी शहरातील विविध भागात कोविड सेंटर उभारण्यात आले. तेथे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडू लागली. त्यामुळे महापालिकेच्या इतर विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्त कोविड सेंटरवर केली. जानेवारीमध्ये वेगाने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आता कमी आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याचे दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर हे आदेश दिले आहेत.

शहरामध्ये करोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची जबाबदारीही महापालिका कार्यक्षेत्रामध्ये कोविड केअर सेंटरवर सोपविली होती. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. तसेच, महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे कामदेखील वाढत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मूळ खात्यात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड सेंटरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले आहे. त्यांना आपल्या मूळ खात्यात काम करण्यास सांगितले आहे. मात्र, भविष्यात गरज पडल्यास या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ कोविड सेंटरच्या कामासाठी उपस्थित राहावे, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT