covid 19 center closed in Pune due to protests by citizens 
पुणे

पुण्यात नागरिकांच्या विरोधामुळे एक कोविड सेंटर बंद

सकाळवृत्तसेवा

कात्रज (ता. ०९) : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आंबेगावमधील भारती विद्यापीठ परिसरात आधार सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून एका रिकाम्या हॉस्टेलमध्ये कोविड केअर सेंटर चालू करण्याचा काही डॉक्टरांनी प्रयत्न केला होता. त्याला महापालिकेकडून रितसर परवानगीही मिळाली होती. मात्र, याला काही स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने हे कोविड केअर सेंटर चालू होण्याच्या आधीच आधीच बंद करण्यात आले आहे. ना नफा ना तोटा तत्वावर २० ऑक्सिजन बेड आणि २० आयसोलेशन बेडचे कोविड केअर सेंटर उभारणीसाठी महापालिका प्रशासनाने आणि परवाना विभागाच्या सहायक आरोग्य अधिकारी मनिषा नाईक कोरोनाची सद्यस्थिती आणि बेड्सची अनुउपलब्धता लक्षात घेता २४ तासांत या कोविड सेंटरला परवानगी दिली होती.

नागरिकांनी दर्शविलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर नागरिक आणि डॉक्टर्स यांच्या एक बैठक झाली. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आमच्याकडे वृद्ध लहान मुले आहेत. आमच्या जिवाला धोका आहे. म्हणून या भागात कोविड सेंटर नको, यावेळी डॉक्टरांकडून आम्हालाही आई-वडील मुलं आहेत. सध्या शहरातील परिस्थिती वाईट आहे. अशी भूमिका मांडण्यात आली. परंतु, तोडगा निघाला नाही. अखेर आता हे सेंटर दुसऱ्या ठिकाणी चालू करण्याचा आधार फाऊंडेशनचा निर्णय झाला आहे. ५ एप्रिलला या सेंटरसाठी परवानगी मिळाली होती. त्यानंतर नागरिकांचा विरोध पाहून डॉक्टरांनी परवानगी रद्द करण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

पुण्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता हे कोविड सेंटर चालू करण्यात येणार होते. शहरातील जास्तीत जास्त कोविड सेंटर ही नागरी वस्तीत आहेत. काही ठिकाणी खाली रुग्णालय आणि वर लोक राहतात. परंतु, नागरिकांच्या विरोधामुळे आम्हाला कोविड सेंटर बंद करावे लागत आहे.
- डॉ. रविंद्रकुमार काटकर, संचालक, आधार फाऊंडेशन

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT