पुणे, ता. 14 : गणेशोत्सव काळात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून उत्सव साजरा करण्यात येईल, असा विश्वास प्रमुख गणेश मंडळांनी व्यक्त केला. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शहरातील मानाचे आणि प्रमुख गणेश मंडळांची बैठक आयोजित केली होती. त्यात डॉ. म्हैसेकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मंडळांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे विश्वस्त महेश सूर्यवंशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून जनजागृतीचे काम सुरु असून, प्रशासनाला सहकार्य करण्यात येईल, असे नमूद केले.
कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी दोनशे सदनिकांचा प्रकल्प पुणे महापालिकेला कोविड सेंटरसाठी देण्यात येणार असल्याचे सांगितले. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाचे प्रमुख पुनीत बालन यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गणेश मंडळाचे कार्यकर्ते हे पोलिस आणि महापालिका प्रशासनासोबत समन्वयाने काम करतील. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून रुग्णांना आणि ज्येष्ठ नागरिकांना वेळेवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल, असे नमूद केले.
उदय जगताप यांनी प्रशासनाच्या व्यवस्थेबाबत सूचना केल्या. पोलिस प्रशासन आणि महापालिका क्षेत्रीय कार्यालय अधिकारी यांच्यात समन्वय साधण्यासाठी समन्वय समिती असावी. कोरोनाच्या समुपदेशनासाठी हेल्पलाईन सुरू करण्यासाठी तयारी दाखवली. सेवा मंडळाचे शिरीष मोहिते यांनी दत्त मंदिराच्या माध्यमातून बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करत असल्याचे सांगितले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
स्थायी समितीचे अध्यक्ष आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे विश्वस्त हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे यांनी प्रशासन आणि गणेश मंडळे यांच्यात समन्वय साधण्याबाबत भूमिका मांडली. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त सुनिल रासने, गुरुजी तालीम मंडळाचे प्रविण परदेशी, नितीन पंडीत तसेच वरिष्ठ अधिकारी राजेंद्र निंबाळकर, माधव जगताप, आशिष महाडदळकर आदी या वेळी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.