Corona Vaccine 
पुणे

पुण्यात 18 वर्षावरील सर्वांना सरसकट लस द्या; कोरोना नियंत्रण आढावा बैठकीची शिफारस

सकाळवृत्तसेवा

पुणे - देशात सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण पुणे शहर व जिल्ह्यात आहेत. त्यामुळे पुणे शहर व जिल्ह्यातील  १८ वर्ष आणि त्यापुढील सर्व वयोगटातील नागरिकांना सरसकट लस द्यावी, अशी शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा निर्णय शुक्रवारी (ता.१२) पुणे जिल्हा कोरोना नियंत्रण व दक्षता समितीच्या आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. पालकमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज कोरोना नियंत्रण आणि दक्षता  समितीची बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थिती उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला. 

बैठकीत पुणे शहरातील कोरोना विषाणूची सद्य:स्थिती व प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत आणि लसीकरणाबाबत पवार यांनी माहिती घेतली. जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत आहे. रुग्ण वाढीचा सर्वाधिक वेग पुण्यात आहे. अशावेळी लसीकरण मोहीम वेगाने होणे गरजेचे आहे म्हणून आजच्या बैठकीमध्ये अठरा वर्षाच्या पुढील सर्व नागरिकांना सरसकट लस द्यावी. अशी शिफारस केंद्राला करण्याचे ठरले आहे. याबद्दलचा पाठपुरावा राज्य सरकार आणि पुण्यातील सर्व खासदार केंद्राकडे करणार आहेत. यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट,  श्रीरंग बारणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार चंद्रकांत पाटील,  मुक्ता टिळक, माधुरी मिसाळ,  सुनील टिंगरे,  सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, डॉ. प्रदीप आवटे आदी उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील कोरोना बाधितांची साखळी तोडण्यासाठी निर्बंधाचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करुन चाचण्या वाढवा. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सर्वेक्षण करा,
गृह विलगीकरणातील नागरिकांशी संपर्क व समन्वय ठेवा्. गृह विलगीकरणातील बाधित अनेकदा नियम पाळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे अशावेळी कठोर कारवाई करावी आणि गृह विलगीकरणाला मान्यता देताना सर्व निकषांची पूर्तता होत असेल, तरच परवानगी द्या, असा असे आदेशही पवार यांनी यावेळी दिला.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता निदानासाठी चाचण्यांची क्षमता वाढविण्याची गरज असल्याचे मत या बैठकीत व्यक्त केले. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी याबाबत  जनजागृती आवश्यक असून यामध्ये सामाजिक संस्थांचा सहभाग वाढविण्याची गरज खासदार बापट यांनी व्यक्त केली. सोसायटयामध्येही याबाबत जागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT