pune crowd sakal
पुणे

T20 World Cup : ...अन्‌ भारताच्या विजयाचा उत्सव पुण्यातील रस्त्यांवर उतरला!

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ...त्या दिवशी विजयोत्सव साजरा करण्याची संधी गमावली होती, पण त्या अपयशाने क्रिकेट खेळाडूंच्या चेहऱ्यावरील निराशा पाहून प्रेक्षकही हेलावले होते. पण आज आपला भारत टि-20 वर्ल्ड कप जिंकेलच, अशी खुणगाठ लाखो क्रिकेट प्रेमींनी मनाशी बाळगली होती आणि होय, शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचक ठरलेल्या सामन्यात भारताने विजयश्री खेचून आणली आणि पुण्यात दिवाळी साजरी झाली.

तरुणांच्या चेहऱ्यावर हास्य, डोळ्यात अश्रू फुलले, चौकाचौकात फटाके फुटले, हातात तिरंगा घेऊन "भारत माता की जय'च्या जयघोष रंगला. अभिमानाने ऊर भरून आलेले लाखो क्रिकेटप्रेमी बघता बघता शहरातील रस्त्यांवर उतरले, रस्ते गर्दीने भरून गेले, अवघा आसमंत विराट-रोहितच्या नावाने दुमदुमून गेला ! निमित्त होते, भारताने टी - २० वर्ल्ड कप जिंकण्याचे !

भारत व दक्षिण आफ्रिका या दोन देशांमध्ये रविवारी रात्री आठ वाजता टि-20 क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना सुरू झाला आणि संपूर्ण शहर अक्षरशः शांत झाले. बहुतांश नागरिक घर, कार्यालय, रस्ते, शहरातील महत्वाचे चौक अशा मिळेल, त्या ठिकाणी क्रिकेट पाहण्यात दंग होऊन गेले. चौकाचौकात लागलेल्या स्क्रीनसमोर क्रिकेट प्रेमींची गर्दी उसळली होती.

कुटुंबच्या कुटुंब क्रिकेट पाहण्यात व्यस्त झाले. क्रिकेटचा सामना जसजसा पुढे जाऊ लागला, तसतसा क्रिकेटशौकीनांचा उत्साह शिगेला पोचला. भारताची बॅटींग संपली आणि दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज लवकर बाद व्हावेत, यासाठी सगळ्यांनीच प्रार्थना करण्यास सुरूवात केली.

एकाच ओव्हर मध्ये जास्त धावा गेल्याने शांत झालेले तरुण सूर्याने घेतलेल्या कॅचनंतर जोरदार जल्लोष करत उत्साहीत झाले. अखेर भारताने हा सामना जिंकला आणि समस्त क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला. शहरातील रस्त्यांवर, चौकाचौकात फटाक्‍यांची आतषबाजी झाली, ठिकठिकाणी साऊंड स्पिकरवर भारताच्या विजयाचे गुणगाण गाण्यात येऊ लागले. तिरंगा लावून, दुचाकीचे सायलेन्सर काढून वेगात वाहने फिरवली जाऊ लागले.

ठिकठिकाणी पेढे, लाडु, साखर वाटप होऊ लागली. त्या आनंदात तरूणाई अरक्षशः धुंद झाली. बघता-बघता तरुणांनी आपल्या दुचाकी, कार काढल्या. त्यावर भारताचा तिरंगा लावून वाहने सुसाट वेगाने फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता, सेनापती बापट रस्ता, टिळक रस्त्यावरुन फिरू लागली.

भारताचा जयघोष करत तरुणाई अक्षरशः रस्त्यातच वाहने थांबवून नाचू लागले. त्यामध्ये तरुणींची संख्याही लक्षणीय होती. अखेर रस्त्यावरील या उंदड जल्लोषाला आवर घालताना पोलिसांचीही तारांबळ उडाली. मध्यरात्रीपर्यंत तरुणांनी रस्त्यावर थांबून भारताचा अवर्णनीय विजयोत्सव साजरा केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT