crime agains pramod jadhav of ransome over fake case of abuse crime pune police Sakal
पुणे

Pune Crime : माळेगावात प्रमोद जाधव यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा

Latest Pune Crime News : ३ मे ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत माळेगाव तसेच जिल्हाधिकारी कार्य़ालय पुणे या ठिकाणी हा प्रकार घडला

कल्याण पाचांगणे : सकाळ वृत्तसेवा

माळेगाव : अल्पवयीन भाच्याबरोबर मामाने अ नैसर्गिक संबंध ठेवल्याची खोटी तक्रार लिहून घेतली व संबंधित मामाकडून वेळोवेळी माळेगाव बुद्रूक (ता.बारामती) येथील ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्याने चार लाख रुपये खंडणी मागितल्याची माहिती आज उशिरा पुढे आली. ३ मे ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत माळेगाव तसेच जिल्हाधिकारी कार्य़ालय पुणे या ठिकाणी हा प्रकार घडला आहे.

त्या प्रकरणी अभिजीत संपतराव शिंदे (वय 30, रा.दंडवाडी, सुपे ता.बारामती) यांनी अशासकिय सदस्य प्रमोद मानसिंग जाधव (रा.माळेगाव बुद्रूक) यांच्या विरुद्ध माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्य़ाद दिली.`` प्रमोद जाधव याने माळेगाव येथील मधुरा रेसिडन्सीमधील ऑफिसमध्ये नेऊन आमच्या अल्पवयीन भाच्याकडून दमबाजी करुन अनैसर्गीक संबंध केल्याचा खोटा तक्रारी अर्ज लिहून घेतला. तसेच त्याबाबतचा अर्धनग्न अवस्थेतील मोबाईवर व्हिडीओ बनविला.

या खोट्या तक्रारीचा व व्हिडीओचा आधार घेत जाधव याने मला चार लाख रुपये खंडणीची मागणी केली. तसेच जाधव यांनी चार लाख रुपयांपैकी २५ हजार रुपयांची खंडणी आज (बुधवारी) स्वीकारली. तसेच माझा अल्पवयीन भाच्याची बदनामी केली, `` अशी तक्रार अभिजित शिंदे यांनी फिर्य़ादिमध्ये नमूद केली. उपलब्ध फिर्य़ादीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी प्रमोद जाधव यांच्या विरुद्ध खंडणीची मागणी करणे, बाल लैंगिक आत्याचार कायद्यांतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला व जाधव याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार खटावकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT