crime Extortion gang lures fake currency notes Uttar Pradesh fake MLA and three arrested esakal
पुणे

Crime News : बनावट नोटांचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

सकाळ वृत्तसेवा

पुणे : उत्तरप्रदेश विधानसभेत आमदार, मंत्री असल्याचा बनाव रचून बनावट नोटांच्या आमिषाने लुबाडणाऱ्या रॅकेटचा वानवडी पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीने एका मार्बल व्यावसायिकाला ३० लाखांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून ५ लाख ३४ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना गुरुवारी रात्री उशिरा अटक केली.

या संदर्भात खराडी येथील ५४ वर्षीय व्यावसायिकाने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुपाली राऊत, संजयकुमार पांडे, विकासकुमार रावत, समीर ऊर्फ विशाल घोगरे (चौघे रा. निलंगा, जि. लातूर) आणि अशोक पाटील (रा. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली राऊत, संजयकुमार पांडे आणि विकासकुमार रावत अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची खराडी बायपास येथे २६ मार्च रोजी रुपाली नावाच्या महिलेसोबत ओळख झाली. त्यावेळी या महिलेने आपण मंत्री आहोत, असे सांगून तिप्पट पैसे मिळवून देण्याची योजना सांगितली. तिने आरोपी पांडे हा उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार असल्याचे सांगून फिर्यादीचे बोलणे करून दिले. त्यांना पाच लाख रुपये दिल्यास त्याच्या मोबदल्यात ३० लाख रुपये परत मिळतील, असे सांगितले.

आमिषाला बळी पडून फिर्यादी हे ३० मार्च रोजी आरोपींना एसआरपीएफ ग्रुप परमारनगर येथे भेटले. त्यावेळी पांडे याने साथीदारांसोबत येऊन केमिकलचा वापर करून बनावट नोटा तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यामुळे या व्यावसायिकाने आरोपींना ५ लाख ३४ हजार रुपये दिले. परंतु आरोपींनी ३० लाख रुपये दिले नाहीत. शिवाय घेतलेली रक्कमही दिली नाही. फिर्यादीने त्यांना पैसे परत मागितल्यानंतर आरोपींनी पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या व्यावसायिकाने वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

सापळा रचून तिघांना अटक

आरोपींनी फिर्यादीला आणखी पैसे दिल्यास ३० लाख रुपयांच्या नोटा देऊ असे सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादीच्या मदतीने सापळा रचून नाशिक फाटा येथे तिघांना अटक केली. या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे. तसेच, किती लोकांची फसवणूक केली, याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: 'मातोश्री'वरुन दिलेले एबी फॉर्म उमेदवारांनी नाकारले? आदित्य ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

Diwali 2024: दिवाळीत भेसळयुक्त खव्यापासून बनवलेली मिठाई खाल्ल्यास होऊ शकतो कॅन्सर, FSSAI ने सांगितले नकली खवा कसा ओळखाल

Sunny Deol : पर्वतांमध्ये रमला सनी देओल, पण चर्चा कॅप्शनचीच; नेटकरी कमेंट करत म्हणाले-

IND vs NZ, 1st Test: भारताला रचिन-साऊदी पडले भारी! न्यूझीलंडकडे तब्बल ३५६ धावांची विक्रमी आघाडी

SCROLL FOR NEXT