Crime News Future of students fake experience certificate Private IT Classes in Pune Sakal
पुणे

Crime News : खोट्या अनुभवपत्रामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

पुण्यातील खासगी आयटी क्लासेस विरोधात विद्यार्थी आक्रमक; पैसे परत करण्याची मागणी

सम्राट कदम

पुणे : आयटी कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी खोटे अनुभवपत्र आणि पार्श्नभूमी देणाऱ्या खासगी क्लासेसने शहरात अक्षरशः धुमाकुळ घातला आहे. राज्यभरातून विद्यार्थी नोकरीच्या आशेने पुण्यात येतात.

त्यांची मोठ्या प्रमाणवर फसवणूक तर होते, त्याचबरोबर त्यांचे करिअर 'बरबाद' होत आहे. कंपन्यांनी बॅग्राउंड व्हेरिफीकेशन सुरू केल्यामुळे आता अशा क्लासेसचे पितळ उघडे पडत आहे. आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्यामुळे विद्यार्थ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

शहरातील एका परिचीत क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांवर यासंबंधीचा व्हिडीओ अपलोड केला असून, पैसे परत करण्याची मागणी ते करत आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि टेस्टींग संबंधीचे प्रशिक्षण, तसेच नोकरी मिळवून देण्याची हमी या क्लासने दिली होती.

त्यासाठी विद्यार्थ्यांनी तब्बल ४२ हजार रूपये शुल्क भरले होते. याच क्लासेसमध्ये शिकणारी निकिता सांगते, "क्लासवाले सुरवातीला वेगळे बोलत होते. आता वेगळे बोलत आहे. आम्ही पैसे भरूनही सॉफ्टवेअर मधील एसक्यूएल, अटॉमेशन किंवा मॅन्यूअल टेस्टिंगचे प्रशिक्षण आम्हाला बेटले नाही.

त्यात खोटे अनुभवपत्र दिल्यामुळे आमचे भविष्य अंधारमय झाले आहे. निदान क्लासवाल्यांनी पैसे तरी परत करावे." खोटे अनुभवपत्र आणि खोटे कौशल्य दाखविणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आयटी कंपन्यांनी अंतर्गत चौकशी सूरू केली असून, दोषी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी अशा प्रलोभनांना बळी पडू नये. स्वतःच्या कौशल्यावर नोकरी मिळावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

आत्ता काय घडतंय....

- हजारो विद्यार्थ्यांनी आयटी कंपनीत नोकरीची हमी देणाऱ्या खासगी क्लासेसमध्ये प्रवेश घेतला

- कंपन्या फ्रेशर्स विद्यार्थ्यांना घेत नसल्याने, क्लासेसवाल्यांनी खोटे अनुभवपत्राचे जुगाड करून दिले

- सुरवातीला अनेक विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या, परंतु कौशल्ये नसल्यामुळे कंपनीच्या लक्षात आले

- मोठ्या आयटी कंपन्यांनी बॅग्राउंड व्हेरीफिकेशन सुरू केले असून, खोट्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे

- क्लासेसच्या दबावामुळे विद्यार्थी खोटी माहिती देत असून, सत्य उघड झाल्यावर ब्लॅक लिस्ट होण्याची भिती

- क्लासेसमध्ये योग्य प्रशिक्षण दिले जात नाही

विद्यार्थ्यांनो बळी पडू नका

- खोट्या क्लासेसमध्ये प्रवेश घेऊ नका

- कौशल्यावर भर द्या, विश्वासार्ह क्लासेस किंवा शिक्षण संस्थेत प्रवेश घ्या

- खोटे अनुभवपत्र आणि बॅग्राउंड जोडू नका

- खोट्या आमिशांना बळी पडू नका

- गुगलसह विविध डिजीटल माध्यमांवर मोफत आयटी कोर्सेस उपलब्ध त्यांद्वारे अभ्यास करा

खोट्या क्लासेसचे हॉटस्पॉट

चिंचवड, विमाननगर, खराडी, मध्यवर्ती पुणे, मगरपट्टा, हडपसर

क्लासेसवाल्यांनी पैसे घेतले. पण ना शिक्षक दिले, ना प्रशिक्षण. आयटीतील महत्त्वाच्या बाबी त्यांनी शिकविल्या नाही. मुलाखतीची तयारीही करून घेतली नाही. त्यांनी खोटे अनुभव पत्र जोडायला लावल्यामुळे बॅग्राउंड व्हेरिफीकेशनमध्ये मी नापास झाले आहे. आता माझे भविष्यही बरबाद झाले.

- श्वेता, खासगी क्लासेसची विद्यार्थीनी

विद्यार्थ्यांनी खोट्या खासगी क्लासेसच्या नादी लागू नका. तुमच्याकडून पैसे घेईपर्यंत हे लोक गोड बोलतात. त्यानंतर तुम्हाला ओळखही देणार नाही. कंपन्या आता सतर्क झाल्या असून, असा खोटा अनुभव देणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यात येतो. त्यापेक्षा कौशल्यावर भर द्या, नोकरी मिळवा.

- रोहित दलाल, नोकरी मार्गदर्शक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT