पुणे : रूबी हॉल क्लिनिकमधील किडनी प्रत्यारोपण प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हे दोघेही एजंट आहेत. अभिजित शशिकांत गटणे (वय ४०, रा. रजूत वीटभट्टी, एरंडवणे गावठाण) आणि रवींद्र महादेव रोडगे (वय ४३, रा. लांडेवाडी, पिंपरी-चिंचवड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी एस पाटील यांच्या न्यायालयाने आरोपींना १८ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. किडनी प्रत्योरापण प्रकरणात किडनी दान करणारी महिला व किडनीची आवश्यकता असलेला पुरुष हे पती-पत्नी असल्याचे दाखविण्यासाठी आरोपींनी लग्नाचे बनावट लग्नाचे छायाचित्र, आधार व मतदार ओळखपत्र तयार केल्याची माहिती सहाय्यक सरकारी वकील दिलीप गायकवाड यांनी न्यायालयाला दिली.
याबाबत, आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम (वय ५९, रा. शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. ऑगस्ट २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान ग्रँट मेडीकल फाउंडेशन रुबी हॉल हॉस्पिटल मध्ये घटला. किडनी प्रत्यारोपणासाठी अमित व सुजाता साळुंखे दाम्पत्याने एजंट रवींद्र रोडगे आणि अभिजित गटणे यांच्या मदतीने कट रचला. त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून रूबी हॉल येथे सादर केली. तर, अन्य आरोपींनी कागदपत्रांची खात्री न करताही कागदपत्रे रिजनल ऑथोरायजेशन कमिटीकडे (ससून) पाठवून दिशाभूल केली. त्यांनी मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी अटक आरोपींसह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी गटणे व रोडगे याला अटक करत शुक्रवारी (ता. १३) न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपींनी अमित साळुंखे व किडनी देणाऱ्या या महिलेस कोणाच्या मदतीने संपर्क साधला. महिलेला किडनी देण्यासाठी किती पैसे देण्याचे कबूल केले होते तसेच तिला किती पैसे दिले. गुन्ह्यातील बनावट दस्तऐवज आरोपींनी कोठे तयार केले यासह गुन्ह्याचा अधिक तपास करायचा असल्याने आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी अॅड. गायकवाड यांनी केली. या गुन्ह्याचा तपास कोरेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक वेताळ करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.