PM Modi Pune Tour 
पुणे

PM Modi Pune Tour: ''कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला, मोदींना ऑफिसमध्ये बसून देखील उद्घाटन करता आलं असतं''

कार्तिक पुजारी

PM Modi Pune Tour cancelled: पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाला आहे. यावरून आता विरोधकांनी निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द झाला आहे. यानिमित्ताने त्यांच्या हस्ते जी उद्घाटनं होती ती रद्द झाली आहेत. पंतप्रधान मोदी पुण्यातील टप्प्या-टप्प्याच्या मेट्रोच्या उद्घाटनासाठी येतात. यामुळे राज्याच्या, देशाच्या तिजोरीवर मोठा बोजा पडतो. याची कल्पना देखील या नेत्याला येत नाही, असं काँग्रेस नेते रविंद्र धंगेकर म्हणाले आहेत.

करोडो रुपयांचा चुराडा या दौऱ्यानिमित्ताने होणार होता आणि तो झाला आहे. त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बसून देखील उद्घाटनं केली आहेत. त्यांनी त्याच पद्धतीने ही उद्घाटनं केली असती तर लाखो रुपये वाचले असते. पण, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा उद्घाटनाचा घाट घातला गेला. पुण्यासाठी काहीतरी करतोय असं दाखवण्याचा हा प्रयत्न होता, असं धंगेकर म्हणाले आहेत.

राजकारण बाजूला ठेवून पुणे मेट्रोचे उद्घाटन करायला हवे. आता पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या किंवा मान्यवरांच्या हातून उद्घाटन करून हा भुयारी मार्ग सुरु करण्यात यावा. सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मार्ग प्रवाशांसाठी आज सुरु करण्यात यावा. यासाठी जनतेचा पैसा खर्च करण्यात येऊ नये. अशी आमची नरेंद्र मोदी आणि प्रशासनाला विनंती आहे, असं ते म्हणाले.

जे राजकारण सुरु आहे ते दुर्दैवी आहे. जनतेचा पैसा वाया घालवू नये, टप्प्याची उद्घाटनं काही महत्त्वाची नाहीत. राज्यातील इतर नेत्याने, पालकमंत्र्याने उद्घाटन केले असते तरी चालले असते. पण, विनाकारण पैसे खर्च केले जात आहेत. मोठ्या प्रमाणात जाहिराती करण्यात येत आहेत. एक पुणेकर म्हणून हा खर्च टाळावा असं धंगेकर म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटली; सोसायटीमध्ये चाकू घेऊन फिरते....

Latest Maharashtra News Updates: सीनेट निवडणूक दुसरा निकाल हाती, युवा सेना ठाकरे गटाच्या शीतल देवरुखकर (SC) 5498 मतांनी विजयी

Mumbai University Senate Election Result: सिनेट निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर, युवासेना उमेदवाराचा विजय

Dhule School Video: शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दिलेल्या चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या; धुळ्यामधील घटना

Share Market Closing: शेअर बाजारात प्रॉफिट बुकिंग; सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला, निफ्टी 26,200च्या खाली

SCROLL FOR NEXT