खडकवासला - कोरोनाचे अनलॉक झाल्यावर सिंहगड पर्यटकांसाठी खुला झाला. त्यानंतर गडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजच्या रविवारी पर्यटकांची संख्या वाढल्याने घाटात वाहतूक कोंडीचा अनुभव अनेक पर्यटकांनी घेतला.
कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकारी संसर्ग वाढू नये म्हणून सिंहगड पर्यटकांसाठी बंद केला होता. त्यानंतर १३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांनी नवीन आदेशाने सिंहगड पर्यटकांसाठी पुन्हा खुला झाला होता. तेव्हापासून सिंहगडावर येणार्या पर्यटकांची संख्या देखील वाढत आहे. अशाच प्रकारे दिवाळीच्या सुट्टीत सात नोव्हेंबर रोजी येथील पर्यटकांची सिंहगडावर गर्दी केली होती. आज रविवारी सुमारे १२ हजार पर्यटक गडावर आले होते.
शनिवार आणि रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांचा ओढा वाढतो. मागील चार पाच दिवसापासून पुणे शहर आणि परिसरात जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत होता. अनेकांना पावसामुळे घरीच थांबावं लागलं होतं परंतु शनिवारी पावसाचे वातावरण झालं. परिणामी रविवारी नागरिकांचा ओढा सिंहगडाकडे वाढला होता. र्विअरी सकाळ पासूनच पर्यटकांच्या वाहनाने गडावर जात होते.
गडावरील वाहनतळ वाहनाने पूर्ण भरल्यानंतर तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी गडावर जाणारे आणि गडावरून परतणाऱ्या अशा पर्यटकांमुळे घाटातील शेवटच्या तीन किलोमीटरच्या टप्प्यात वाहतूक कोंडीचा अनुभव अनेक पर्यटकांना आला. अखेर वनसंरक्षण समितीचे सुरक्षारक्षक व पर्यटकांनी मिळून ही वाहतूक कोंडी सोडविली.
शनिवार दिनांक चार डिसेंबर रोजी सिंहगडावर ६४८ दुचाकीवरून १३०० पर्यटक गडावर पोहोचले. तर ४०७ चारचाकी वाहनातून सुमारे दोन हजार ३५ पर्यटक गडावर पोचले. सुमारे एवढेच पर्यटक खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातून गडावर पोचले. म्हणजे शनिवारी सिंहगडावर सुमारे पाच हजार दोनशे पर्यटक गडावर पोहोचले. रविवार दिनांक पाच डिसेंबर रोजी एक हजार ९५८ दुचाकीनेसुमारे चार हजार पर्यटक गडावर पोचले.
तर ५७९ चारचाकीतून दोन हजार ९०० पर्यटक गडावर पोहोचले. सुमारे तेवढेच पर्यटक खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनातून पोचले. अशाप्रकारे रविवारी सुमारे १२ हजार ३०० पेक्षा जास्त पर्यटक गडावर पोचले. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत सुमारे १७ हजार ५०० पर्यटक दोन दिवसात सिंहगडावर पोचले. शेवटच्या दोन किलो मीटर मध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडी वनविभाग व हवेली पोलिस यांच्या वतीने या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.