cyber crime news pune Extortion defaming youth through online loans  Sakal
पुणे

Pune Cyber Crime : ऑनलाईन कर्ज प्रकारातुन तरुणांची बदनामी करीत खंडणी मागण्याचा प्रकार

कोंढवा पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ऑनलाईन कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या मोबाईल ऍपच्या माध्यमातून दोन तरूणांची बदनामी करुन त्यांच्याकडे खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात अनोळखी मोबाईल धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात दोन तरुणांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अनोळखी मोबाईलधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील शिवनेरी नगरमध्ये राहणाऱ्या एका 37 वर्षीय तरुणाला त्याच्या मोबाईलवर 1 जानेवारी 2022 रोजी 30 हजार रुपये कर्ज मंजुर झाल्याचा मेसेज आला होता.

तसेच मेसेज खाली दिलेली लिंक उघडून त्यामधील माहिती भरण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार, फिर्यादींनी संबंधित लिंक उघडून त्यावरील माहिती भरली. त्यानंतर त्यांना एका अनोळखी व्यक्तीने संपर्क साधत त्यांच्याकडे 5 हजार 700 रूपयांची मागणी केली. जर पैसे भरले नाही तर तुझी बदनामी करू, अशी धमकीही त्याने दिली. तसेच फिर्यादीची छायाचित्रे मॉर्फ करुन एका महिलेसोबतची अश्‍लिल छायाचित्रे फिर्यादीच्या मित्राला व बहिणीला पाठविली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणाने थेट पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली.

दरम्यान, कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत याच स्वरुपाचा आणखी एक प्रकार घडला. हा प्रकार 9 ते 17 जानेवारी 2022 या कालावधीत घडला. कोंढव्यातील 34 वर्षीय तरुणाला 4 हजार रुपयांची गरज होती. त्यामुळे त्याने "कॅश ऍडव्हान्स' नावाचे ऍप डाऊनलोड केले. त्यातुन त्याने तत्काळ कर्ज घेतले. परंतु, तरुणाने वेळेत कर्जाची परतफेड न केल्याने अनोळखी मोबाईल धारकाने त्यास फोन करुन धमकाविण्यास सुरुवात केली.

"तुझी लायकी नव्हती, तर तु कर्ज घेतलेसच कशाला' अशा शब्दात धमकी देत तरुणाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच तरुणाच्या मेव्हण्याला तरुणाबाबतचे अश्‍लिल मेसेज पाठवून त्याची बदनामी केली. अखेर या त्रासाला कंटाळून तरुणाने याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्याची पडताळणी झाल्यानंतर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अशी घ्या काळजी

- कोणत्याही "मोबाईल लोन ऍप'ला प्रतिसाद देऊ नये

- कर्ज मंजुर झाल्याच्या मेसेज, लिंकला प्रतिसाद देऊ नका

- कॉन्टॅक्‍ट लिस्ट, गॅलरी "तारण' ठेवण्याचा प्रकार करु नये

- चुकीची माहिती घेणाऱ्यांपासून खबरदारी घ्यावी

- विना कागदपत्रे कर्ज देणाऱ्यांपासून सावध रहा.

इथे साधा संपर्क -

सायबर पोलिस ठाणे - 020-29710097

ई-मेल - crimecyber.pune@nic.in

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT