Cyber crime
Cyber crime eSakal
पुणे

Cyber Crime : सायबर चोरांकडून नऊ जणांना गंडा; तब्बल दीड कोटीची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सायबर चोरट्यांनी नऊ जणांची तब्बल एक कोटी ४० लाख ७५ हजार ७६० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. चोरटे वेगवेगळी आमिषे दाखवून नागरिकांची फसवणूक करत असल्याचे उघडकीस आले आहे.

२८ लाखांची फसवणूक

जबरदस्तीने शेअर विकत घ्यायला लावून सायबर चोरट्याने खराडी येथील एकाची २८ लाख २० हजारांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी ३७ वर्षीय व्यक्तीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २४ एप्रिल ते सहा जूनदरम्यान घडली. सायबर चोरट्याने फिर्यादीला लिंक पाठवून एका ग्रुपमध्ये जोडले. यानंतर गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे सांगून जबरदस्तीने शेअर विकत घ्यायला लावून फसवणूक केली.

स्टॉक, आयपीओचे आमिष

फेसबुकवरून जाहिरात पाठवत स्टॉक तसेच आयपीओ मिळवून देण्याच्या आमिषाने बाणेर येथे राहणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीची २७ लाख ६५ हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ५ ते २३ डिसेंबर २०२३ दरम्यान ही घटना घडली. तसेच सायबर चोरट्यांनी शेअर बाजाराच्या आमिषाने वारजे येथील २४ वर्षीय तरुणाची १७ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी वारजे ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

आयटी कायद्यानुसार गुन्हा

ब्लॉक डीलमधील शेअर खरेदीच्या आमिषाने सायबर चोरट्याने ५१ वर्षीय व्यक्तीची १६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जबरदस्तीने शेअर विक्री

जबरदस्तीने शेअर विकत घ्यायला लावून सायबर चोरट्याने चंदननगर येथील ३५ वर्षीय तरुणाची १३ लाख ४० हजार ६४५ रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी चंदननगर ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

जादा नफ्याचे आमिष

शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे सांगून कर्वेनगर येथील महिलेची १३ लाख १४ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी ५८ वर्षीय महिलेने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दोन तरुणींची फसवणूक

मनी लॉन्डरिंगची केस असल्याचे सांगून २६ वर्षीय तरुणीची ११ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी बाणेर येथे राहणाऱ्या तरुणीने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तसेच टास्कच्या आमिषाने कोथरूड येथील २१ वर्षीय तरुणाची सात लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कर्ज क्लोज करण्यात येईल, असे सांगून आंबेगाव येथील ४६ वर्षीय व्यक्तीची पाच लाख २५ हजार ४८६ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Arrival Live Updates : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमान तळावर टीम इंडियाला देण्यात आली सलामी

Champions Trophy 2025 Schedule : पुढच्या वर्षाची सुरूवात होणार धमाकेदार; पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं शेड्युल एका क्लिकवर

Team India Victory Parade: टीम इंडियाच्या स्वागतासाठी 'बेस्ट'ची बस का नाही? गुजरातची बसच का? रोहित पवारांचा सवाल

Maharashtra Live News Updates : पुणे-दोंडाई बसचा अपघात, बसमध्ये एकूण 26 प्रवाशी

Asteroid Alert: पृथ्वी नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी भारत बजावणार महत्वाची भूमिका, ISRO चीफ सोमनाथ काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT