Cyber Crime sakal
पुणे

Cyber Crime : पुणेकरांच्या पैशावर सायबर चोरटे झाले मालामाल; सहा महिन्यांत ७१ कोटींचा गंडा

अनिल सावळे -@AnilSawale

पुणे - शेअर बाजारात गुंतवणुकीवर कमी कालावधीत कोणी दुप्पट-तिप्पट परताव्याचे आमिष दाखवत असेल तर थोडं थांबा. कारणही तसेच आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून शहरात दररोज फसवणुकीच्या घटना घडत आहेत. सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून पुणेकरांची ७१ कोटी रुपयांची फसवणूक सहा महिन्यांत केली आहे.

घटना क्रमांक १

भेकराईनगरमधील ५६ वर्षीय जवाहर यांना सायबर चोरट्यांनी ब्लॅक रॉक कॅपिटल जी-१ व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यांचे शेअर ट्रेडिंग खाते सुरू केले. जास्त फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना बॅंक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. परंतु त्यानंतर परतावा न देता त्यांची सुमारे ४० लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत तक्रार दिल्यानंतर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

घटना क्रमांक २

वाघोली येथील ज्ञानेश्वरनामक ४३ वर्षीय व्यक्ती. त्यांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून शेअर बाजाराबाबत माहिती दिली. त्यानंतर ॲपद्वारे डिजिटल गुंतवणूक करून जादा नफा देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार ज्ञानेश्वर यांनी बॅंक खात्यात सात लाख ६८ हजार रुपये जमा केले. परंतु त्यांना परतावा मिळाला नाही. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

घटना क्रमांक ३

म्हाळुंगे-बालेवाडीतील ७३ वर्षीय बजरंगलाल यांना व्हॉट्सॲपवर अनोळखी व्यक्तीने संदेश पाठविला. नामांकित कंपनीतून बोलत असल्याचे सांगून शेअर बाजारात गुंतवणूक करण्याबाबत माहिती दिली. तुमचा जास्तीत जास्त फायदा करून देऊ, असे आमिष दाखवून पाच लाख रुपये ऑनलाइन भरण्यास भाग पाडले. परंतु त्यानंतर एक दमडीही नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तक्रार दिली. याबाबत चतुःशृंगी पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गुन्ह्याची पद्धत

सायबर चोरट्यांकडून तुमच्या व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवर मेसेजद्वारे लिंक पाठवली जाते. संकेतस्थळावरून डिमॅट खाते उघडण्याबाबत कागदोपत्री प्रक्रिया केली जाते. त्यानंतर संबंधित व्यक्तीला लिंक पाठवून एक ॲप डाउनलोड करण्यास सांगितले जाते. सुरुवातीला ॲपद्वारे पाच ते दहा हजार रुपये भरण्यास सांगितले जाते. त्याच्या मोबदल्यात दुप्पट रक्कम जमा करून विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर जास्त रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडून लाखो रुपयांची फसवणूक केली जाते.

हेल्पलाइन क्रमांक - १९३०

शेअर्स ट्रेडिंगमध्ये झालेली फसवणूक (एक जानेवारी ते १५ जुलै २०२४)

  • १९६ - सायबर पोलिस ठाण्यात दाखल गुन्हे

  • ७१ कोटी रुपये - फसवणूक झालेली रक्कम

शेअर ट्रेडिंग करताना ती कंपनी ‘सेबी’कडे नोंदणीकृत असल्याची खात्री करावी. ‘सेबी’कडे नोंदणीकृत शेअर ब्रोकरद्वारेच व्यवहार करावा. सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीने पाठविलेली लिंक डाउनलोड करू नये. अनोळखी व्यक्तीला ओटीपी, पासवर्ड देऊ नका. तसेच, कोणत्याही आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नये.

- विक्रांत देशमुख, पोलिस उपायुक्त, सायबर गुन्हे शाखा

अनोळखी व्यक्तीशी फोनवर संभाषण टाळावे. शेअर बाजारातील खरेदी-विक्री डी-मॅट खात्याद्वारेच होते. शेअर बाजारात रोखीने व्यवहार होत नाहीत. शेअर बाजार आणि फिक्स परतावा या विरुद्ध बाबी आहेत. फिक्स परताव्याच्या आमिषानेच फसवणूक होते. ‘सेबी’कडे नोंदणीकृत आणि परिचित ब्रोकरद्वारेच व्यवहार करावेत.

- श्रीनिवास जाखोटिया, गुंतवणूकतज्ज्ञ

फसवणूक झाल्यास काय कराल?

https://cybercrime.gov.in संकेतस्थळावर आणि नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT