रविंद्र धंगेकर - अक्षय गोडसे Esakal
पुणे

सरचिटणीस एका पक्षाचे उमेदवार;उत्सव प्रमुखांचा पाठिंबा मात्र विरोधी पक्षाला

पुण्याच्या कसबा पेठ पोट निवडणुकीचा प्रचार अंतीम टप्प्याकडं जात असताना त्यात अधिक रंगत येत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी आपला पाठिंबा महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर केला आहे

सकाळ डिजिटल टीम

पुणे- पुण्याच्या कसबा पेठ पोट निवडणुकीचा प्रचार अंतीम टप्प्याकडं जात असताना त्यात अधिक रंगत येत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी आपला पाठिंबा महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर केला आहे. (Dagadusheth Trustee Backs Mavavikas Aghadi Candidate in Kasba Bypolls)

पुण्यात कसबा पोटनिडणुकीचा (Kasba Byelection) प्रचार हे शिगेला पोहचलं असून भारतीय जनता पक्ष (BJP) तसेच महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) जोरदार प्रचार सुरू असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत.त्यातच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा केल्याने भाजप उमेदवार हेमंत रासने यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण सरचिटणीसपदी कसबा पोटनिवडणुकीतले भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे आहेत. तर उत्सव प्रमुख अक्षय गोडसे आहेत.अश्यातच उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा दिल्याने गणेश मंडळामध्ये चर्चेला सुरवात झाली आहे.

अक्षय गोडसे हे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट चे माजी अध्यक्ष कै.अशोक गोडसे यांचे पुत्र असून तात्या गोडसे हे अक्षय याचे आजोबा आहे.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या उभारणीत गोडसे परिवारच एक मोठं योगदान असून अक्षय यांच्या या पाठिंब्याने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्येही आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT