Dagdusheth Halwai Ganapati Temple closed due to corona 
पुणे

Pune : दगडूशेठ गणपती परिसरात मोबाइल चोऱ्या; परप्रांतीय महिला टोळीला अटक

कोरोनाच्या दोन वर्षानंतर पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांच्या गर्दीला अक्षरशः तुफान आल्याची सद्यस्थिती आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोरोनाच्या दोन वर्षानंतर पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांच्या गर्दीला अक्षरशः तुफान आल्याची सद्यस्थिती आहे.

पुणे - कोरोनाच्या दोन वर्षानंतर पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांच्या गर्दीला अक्षरशः तुफान आल्याची सद्यस्थिती आहे. गणपती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असतानाच, त्यातच चोरट्यांवर पोलिसांचा वचक नसल्याने गणेशोत्सवाच्या गर्दीमध्ये चोरट्यांनाही भलतेच उधाण आले असून सहा दिवसातच पावणे सहाशेहून अधिक मोबाईल चोरल्याची सद्यस्थिती आहे. तर चोरट्यांच्या आंतरराज्य महिला टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

गणेशोत्सवामध्ये गणपती पाहण्यासाठी जोडून आलेल्या शनिवार व रविवारच्या सुट्टीचा फायदा घेत लाखो भाविकांनी शहरातील मध्यवर्ती भागामध्ये दोन दिवस अक्षरशः तुफान गर्दी केली होती. केवळ पुणे शहर, जिल्ह्यातुनच नव्हे, तर राज्याच्या ग्रामीण भागातुन, परराज्यातुनही काही नागरीक गणेशोत्सव पाहण्यासाठी दाखल झाले आहेत. बहुतांश नागरीक आपल्या कुटुंबीयांसह गणपती पाहण्यास प्राधान्य देत असल्याचे समाधानकारक चित्र यंदा अनुभवायला मिळू लागले आहे. असे असतानाच, चोरट्यांच्या चोरी करण्याच्या प्रकारामध्येही वाढ झाली असल्याची सद्यस्थिती आहे. गणेशोत्सवामध्ये होणारी गदीॅ लक्षात घेऊन परराज्यातील चोरट्यांच्या टोळ्यादेखील गणेशोत्सवात सक्रीय झाल्या आहेत. त्यानुसार, गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ते सोमवारपर्यंत भाविकांचे तब्बल 583 मोबाईल चोरीला गेल्याच्या ऑनलाईन तक्रारी पुणे पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. 583 मोबाईल चोरीला गेले असून चोरट्यांना पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांसह साध्या वेशातील पोलिसांची नेमणूक केली असल्याचे अतिरीक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले.

दरम्यान, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर परिसरात देखावे पाहण्यासाठी आलेल्या एका महिलेचा 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मोटाईल चोरीला गेला होता.हा मोबाईल काही महिलांनी चोरला होता. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी चार जणींना तत्काळ अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातुन काही मोबाईल जप्त केले.

...तरीही चोरट्यांचे धाडस कायम !

गणेशोत्सवात प्रमुख मंडळे, मानाचे गणपती, गर्दीचे चौक अशा ठिकाणी स्थानिक पोलिस ठाणे, गुन्हे शाखेच्या पथकांसह अन्य पोलिसही बंदोबस्त करीत आहेत. मात्र असे असतानाही नेमकी गर्दीचीच ठिकाणे हेरून चोरट्यांकडून मोबाईल, पर्स, मौल्यवान दागिने चोरण्याच्या घटना घडत आहेत. बंदोबस्तावर पोलिसांची नजर असतानाही चोरट्यांकडून चोरीचे धाडस दाखविले जात असल्याने चोरट्यांवरही पोलिसांचा वचक राहिला नसल्याची सद्यस्थिती आहे.

दर्शन रांगेत ज्येष्ठ नागरीकाची रोकड चोरणाऱ्यास अटक

दगडूशेठ हलवाई गणपती मंडपात दर्शन घेण्यासाठी रांगेत थांबलेल्या एक ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातून चोरट्याने दोन हजार रुपयांची रोकड चोरण्याचा प्रयत्न केला. हि घटना रविवारी (ता.4) दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रसंगी विलास निकाळे (वय 70, रा. भुमकर मळा) यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी संदीप सुनील बोरसे (वय 27, रा. खरदे, शिरपूर, धुळे ) यास अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT