पुणे : आमचे आता पटणार नाही आणि एकत्र राहणे तर शक्यच नाही, अशी खात्री पटली होती. आम्हा दोघांचे वय 32 च्या आत आहे. आर्थिक परिस्थिती देखील चांगली आहे. एकत्र राहून एकमेकांना त्रास देण्यापेक्षा वाद न घालता विभक्त होऊ आणि पुन्हा नवीन आयुष्य सुरू करू, या भावनेतून रिया आणि अक्षय (नावे बदललेली) परस्पर संमतीने वेगळे झाले.
या जोडप्याच्या आयुष्यात आलेला प्रसंग सध्या अनेकजण अनुभवत आहेत. त्यामुळे वाद घालत आयुष्य जगण्यापेक्षा एकत्र बसून शांतपणे चर्चा करू, एकमेकांच्या अपेक्षा समजून घेऊ आणि विभक्त होऊ, अशी मानसिकता वाढत आहे. अशा प्रकारचे दररोज सरासरी पाच दावे दाखल होत असल्याचे समोर आले आहे.
गेल्या 20 महिन्यांत येथील कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी तीन हजार 152 अर्ज दाखल झाले आहेत. तर या काळात संमतीने विभक्त होण्याचे एक हजार 912 दावे निकाली काढण्यात आले आहेत. तर एकतर्फी घटस्फोट, नांदवयास येण्यासाठी आणि विवाह रद्दबातल करण्यासाठी 1 जानेवारी 2018 ते 31 ऑगस्टअखेरीस चार हजार 273 अर्ज आले आहेत. या कालावधीत याबाबतचे 3 हजार 484 अर्जांवर निकाल देण्यात आला आहे. पती किंवा पत्नी कोणा एकाला घटस्फोट हवा आहे म्हणून दावा दाखल करण्याच्या तुलनेत 90 टक्के जोडपी संमतीने वेगळी होत आहेत.
शारीरिक आणि मानसिक त्रास, वेळ आणि पैसा वाचविण्यासाठी जोडपी दोघांच्या मर्जीने घटस्फोटाचा अर्ज दाखल करीत आहेत. गेल्या काही महिन्यांत अशा दाव्यांचे प्रमाण वाढले आहे. दावा दाखल करण्यापूर्वी आम्ही दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो, पण एकत्र येणे शक्य नसेल ,तर त्यांना संमतीने विभक्त होण्याचा सल्ला देतो.
- ऍड. वैशाली चांदणे
संमतीने घटस्फोट घेण्याची कारणे :
- शारीरिक आणि मानसिक त्रास कमी होण्यासाठी
- मर्जीने अर्ज केल्याने द्वेष भावना निर्माण होत नाही.
- वेळ, पैसा वाचतो आणि कमी वेळा न्यायालयात जावे लागते.
- घटस्फोटाची प्रक्रिया लवकर होते.
- एकमेकांची बदनामी होत नाही.
- मुलांना जास्त त्रास सोसावा लागत नाही.
1 जानेवारी 2018 ते 31 ऑगस्ट 2020 दरम्यान दाखल-निकाली दावे :
अर्जाचा प्रकार | दाखल दावे | निकाली दावे | लोकअदालतील निकाली दावे |
1) एकतर्फी घटस्फोट - नांदवयास येण्यासाठी - विवाह रद्द बातल करण्यासाठी |
4273 | 3484 | 65 |
2) मनाई, ताकीद व ठराव करून मिळण्याबाबत |
89 | 39 | 1 |
3) दिवाणी व कायमची पोटगी - स्थावर व जंगम मालमत्तेचे वाटप |
47 | 21 | 1 |
4) मुलांचा ताबा मिळण्याबाबत | 99 | 35 | - |
5) परस्पर संमतीने घटस्फोट घेणेकरीता | 3152 | 1910 | 2 |
6) इतर | 1,978 | 1827 |
25 |
एकूण | 9638 | 7316 | 93 |
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.