Milk sakal
पुणे

Dairy Farmers : आम्हाला अनुदानाची कुबडी नकोय, तर कष्टाच्या घामाचा दर हवाय!

आम्हाला अनुदानाची कुबडी नकोय, तर कष्टाच्या घामाचा दर हवाय! आम्हाला सरसकट ३५ रुपये दर द्यावा अनुदान देऊन आमची थट्टा करू नये, अशी संतप्त प्रतिक्रिया दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

नवनाथ भेके

निरगुडसर - आम्हाला अनुदानाची कुबडी नकोय, तर कष्टाच्या घामाचा दर हवाय! आम्हाला सरसकट ३५ रुपये दर द्यावा अनुदान देऊन आमची थट्टा करू नये, अशी संतप्त प्रतिक्रिया दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना खाजगी व सहकारी दूध संघ ३० रुपये प्रति लिटर दूध दर देऊन अवघे तीन महिने उलटले नाही तर १ ऑक्टोंबरपासून प्रत्यक्ष दर प्रति लिटर २ रुपयांनी कमी करून अनुदानाची २ रुपयाच्या कुबडीत वाढ करण्याचे सरकारने जाहीर केले आहे.

राज्यातील सहकारी आणि खासगी दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर २५ रुपयांपासून पासून २७ रुपये असा दर मिळत होता. या दरामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भागत नाही. यामध्ये पशुखाद्यांचे दर वाढल्यामुळे व्यवसाय पूर्ण मोडकळीस येऊ लागला आहे.

यासाठी राज्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना खाजगी व सहकारी दूध संघ प्रति लिटर ३.५ फॅट आणि ८.५ एम एस एफ साठी ३० रुपये दर व राज्य सरकार ५ रुपये अनुदान असे एकूण ३५ रुपये प्रति लिटर दर सरकारने जाहीर केला. पण हा दर शेतकऱ्यांना १जुलै पासून देण्याची घोषणा राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली, पण शेतकऱ्याचा पदरात हा दर उशिराच पडला आणि अनुदान सर्व शेतकऱ्यांना अजून नाहीच.

सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. खाजगी व सहकारी दूध संघावर सरकारचे नियंत्रण नसल्याने दुध व्यवसायातील अडचणी खूप वाढल्या आहेत. ३० रुपये प्रति लिटर दर खासगी आणि सहकारी दूध संघ शेतकऱ्यांना द्यायला तयार नसून २८ रुपये प्रति लिटर दरावर ठाम आहेत.

या भूमिकेमुळे १ ऑक्टोंबर पासून शेतकऱ्यांना खासगी व सहकारी दूध संघाकडून २८ रुपये प्रति लिटर दर मिळणार आहे. तर अनुदानापोटी ५ ऐवजी ७ रुपये प्रति लिटर सरकारकडून मिळणार आहे. या दुधाच्या निर्णयावरून सिद्ध होत असून सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे काम सुरू आहे, हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

आत्तापर्यंत सरकारने कायमच आपल्या धोरणामध्ये धरसोडीचे धोरण अवलंबले असून सरकार आपल्या भूमिकेवर ठाम नाही, दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने अनुदानासहित देऊ केलेला ३५ रुपये हा दर देखील परवडणारा नाही. दुधाला किमान ४० रुपये लिटर दर मिळणे गरजेचा आहे.

एक लिटरमागे होणारा उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणामध्ये वाढला असून, पशुखाद्याचे व चाऱ्याचे वाढलेले भरमसाठ दर यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दूध व्यवसाय मोडून पडतो की काय अशी भीती निर्माण झालेली असताना राज्य सरकारने घेतलेला निर्णय संताप जनक आहे.

शेतकऱ्यांना अगोदर पशुखाद्य,चाऱ्याला पैसे मोजावे लागतात अनुदानाचा अजूनही पत्ता नाही. अशा अवस्थेमध्ये पदरमोड करून तोट्यामध्ये शेतकऱ्यांना दूध व्यवसाय करावा लागत आहे. २०१७ या वर्षात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनानंतर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना दर वाढवून देऊन नंतर अनुदानाचे पैसे खाजगी व सहकारी दूध संघांना दिले जात होते. त्याच धर्तीवर सरकारने हे पैसे दिले पाहिजे तर शेतकरी या अडचणीतून बाहेर येईल नाहीतर दूध व्यवसाय मोडून पडल्याशिवाय राहणार नाही.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर म्हणाले की,शेतकऱ्याची शेताच्या बांधावर काय अवस्था आहे. हे राज्यात सत्तेत बसलेल्या सत्ताधाऱ्यांना कळत कसं नाही. त्याठिकाणी बसून ते वाटेल तो निर्णय घेत आहे. अशामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची प्रचंड अडचण निर्माण झाली आहे.

सरकार जर अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणार असेल तर दूध उत्पादकांना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल. सरकारने १ जुलैपासून ३.५ फॅट ८.५ एस एन एफ ला ३० रुपये दर व ५ रुपये अनुदानाची घोषणा केली होती. हे एक जुलैचे अनुदान अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नाही याआधी देखील अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत.

आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळून शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचे काम सरकार करत आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचा पोर खेळ सरकारने मांडला आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया प्रभाकर बांगर यांनी दिली आहे.

मी आदिवासी भागातील दूध उत्पादक शेतकरी असून माझे दररोज १२० लिटर दूध संकलन आहे. सरकारकडून दुधाला मिळणारा दर खूप कमी मिळत आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेने प्रत्यक्षात ४० रुपये दर मिळाला पाहिजे, सरकारने ३० रुपये दर देऊन तीन महिने उलटले नाही तोच दर २ रुपयांनी कमी करून २ रुपये अनुदान रुपी १ ऑक्टोंबर पासून वाढवणार आहे.

पण तुमच्या पाच, सात रुपये प्रति लिटर मिळणाऱ्या अनुदानाची कुबडी नकोय, आम्हाला आमच्या घामाचा दर हवाय. असल्याचे आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील बेंढारवाडी-पोखरी येथील दूध उत्पादक शेतकरी अशोक कोळप यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तीनही पोटनिवडणुकीत काँग्रेसची बाजी; भाजप-धजद युतीला धक्का, माजी मुख्यमंत्र्यांचे दोन पुत्र पराभूत

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: आयपीएलचा मेगा लिलाव आज! थोड्याच वेळात सौदी अरेबियात खेळाडूंवर बोली लागणार

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी भाजपकडे भीक मागितली, पण.... अब्दुल सत्तार यांचा खोचक टोला

IND vs AUS 1st Test : विराट कोहलीचे १६ महिन्यांनंतर कसोटीत शतक! भारताचे यजमानांसमोर ५३४ धावांचे तगडे लक्ष्य

Oath Ceremony: महायुतीच्या बैठकांचा धडाका, पुढील रणनिती आखण्यावर चर्चा, शपथविधीबाबत मोठी माहिती समोर!

SCROLL FOR NEXT