पुणे

कापूरहोळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका

CD

भोर, ता. २ : कापूरहोळ ते भोर मार्गावरील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतुकीसाठी कळविलेल्या पर्यायी मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. सुमारे दोन फूट खोल असलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

कापूरहोळ-भोर मार्गावरील सांगवी ते भोलावडे आणि आळंदे ते कासुर्डी या टापूत हे खड्डे पडलेले आहेत. एकतर कळविलेल्या रस्त्याची रुंदी अतिशय कमी आहे. त्यामुळे एकावेळी एकच वाहन जाऊ शकते. त्यातच खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करून वाहन चालवावे लागते. खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा सतत लागतात. दुचाकी आणि मोटारी या खड्ड्यांमध्ये अडकून पडत आहेत.

अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही
संबंधित ठेकेदार रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहेत. ठेकेदाराच्या गाड्याही आणि वाहनेही या खड्ड्यांत अडकून पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तरी देखील ठेकेदाराकडून कोणत्याही उपाययोजना होत नाही. वाहनचालक नाराजी व्यक्त करीत आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : विधानसभेच्या तयारीला लागा! केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा जाहीर; 'या' दोन तारखा आहेत महत्त्वाच्या

Bank Deposit: भारतात बँक ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचे युग संपले; SBIच्या माजी प्रमुख असं का म्हणाल्या?

Latest Marathi News Updates : काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला पोहोचले

Sharad Pawar: श्रीगोंद्याचे शिष्टमंडळ घेणार शरद पवारांची भेट, जाणून घ्या काय आहे कारण?

आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले अन्...! R Ashwin शतकी खेळीनंतर काय म्हणाला ते वाचा

SCROLL FOR NEXT