Darshana Pawar Murder Case esakal
पुणे

Pune Crime : कंपासमधील कटरने गळ्यावर वार करत डोक्यात घातला दगड; राहुल हंडोरेने दिली कबुली

लग्नाच्या कारणावरून वाद झाल्यानंतर रागाच्या भरात दर्शनावर कंपासमधील कटर ब्लेडने तीन ते चारवेळा वार केले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - लग्नाच्या कारणावरून वाद झाल्यानंतर रागाच्या भरात दर्शनावर कंपासमधील कटर ब्लेडने तीन ते चारवेळा वार केले. कटरचा वार गळ्याला लागल्याने दर्शनाच्या गळ्यातून रक्तस्राव सुरु झाला. त्यानंतर दगडाने मारहाण करत तिचा खून केला, अशी कबुली आरोपी राहुल हंडोरे याने सोमवारी पोलिसांना दिली.

मात्र, हे सगळे माझ्या हातून अनवधानाने घडले, असेही राहुलने चौकशीदरम्यान सांगितल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

एमपीएससीच्या परीक्षेसाठी आम्ही दोघे एकत्र अभ्यास करत होतो. यादरम्यान मी तिला प्रपोजही केले होते. एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी तिला मदत केली. एमपीएससी परीक्षा पास झाल्यावर दर्शनाने लग्नाला नकार दिला. याचाच राग आल्याने मी तिला संपवायचे ठरविल्याचे राहुल याने चौकशीदरम्यान सांगितले. या घटनेच्या सीसीटीव्हीबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दर्शना ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत राज्यात विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झाली होती. तिचा खून झाल्यामुळे खळबळ उडाली होती. घटनास्थळी मोबाईल, बूट ,गॉगल, पर्स, ओढणी या वस्तूंवरून दर्शनाच्या मृतदेहाची ओळख पटली.

शवविच्छेदन अहवालात डोक्यावर आणि अंगावरील मारहाणीच्या जखमांमुळे दर्शनाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. १८ जून रोजी दर्शना पवार हिचा राजगडाच्या पायथ्याशी मृतदेह सापडला होता. ती मित्र राहुलसोबत राजगडावर ट्रेकिंगसाठी गेल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याला २१ जून रोजी रात्री उशिरा त्याला मुंबईत अटक करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

Latest Maharashtra News Updates live : दिवाळीनंतर कार्यकर्त्यांची दिवाळी

SCROLL FOR NEXT