dashkriya vidhi is camping place for political leaders chakan pune marathi news sakal
पुणे

Pune News : दशक्रिया विधी झालेत राजकीय नेत्यांची सभास्थळे?

दशक्रिया विधी म्हटलं की ती राजकीय नेत्यांची सभास्थळे झालेत का हा प्रश्न सध्या निर्माण झाला

हरिदास कड - सकाळ वृत्तसेवा

Chakan News : कोणताही दशक्रिया विधी असला की दशक्रिया विधीला राजकीय नेत्यांची मोठी गर्दी होते. त्यातून भाषणबाजी एकमेकांची उणीदुनी, टीकाटिप्पणी याला ऊत आला आहे.दशक्रिया विधिला उपस्थित असलेले सर्वसामान्य नागरिक, मृत व्यक्तीच्या कुटुंबाचे नातेवाईक,कुटुंब अक्षरशः कंटाळले आहे हे चित्र जिकडे तिकडे सर्रास पहावयास मिळत आहे.

त्यामुळे दशक्रिया विधी म्हटलं की ती राजकीय नेत्यांची सभास्थळे झालेत का हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात दशक्रिया विधी चे कार्यक्रम म्हणजे राजकीय नेत्यांची सभास्थळे झालेली आहेत असे पाहावयास मिळते.

दशक्रिया विधी कोणाचाही असला तर त्या कुटुंबाचे, मृत्यू झालेल्या व्यक्तीची माहिती देऊन सांत्वन करण्याऐवजी राजकीय नेत्यांची भाषणे लांबलचक, रटाळवाणी होत आहेत. राजकीय नेता, पदाधिकारी,कार्यकर्ता भाषण करतो.

परंतु उपस्थित असलेले लोक मात्र खाली बसून त्याची चक्क टवाळी करतात. खाली बसलेले वेगळ्याच गप्पा मारत असतात असे वास्तव आहे. कोण कुणाचे ऐकतो हेच कळत नाही.राजकीय नेत्यांच्या भाषणबाजीत एकमेकावर टीकाटिप्पणी करणे, पक्षाचा प्रचार करणे असेच प्रकार सातत्याने घडत आहे.

खेड तालुक्यात अशा प्रकारांना मोठा ऊत आला आहे. खेड तालुक्यात दशक्रिया विधी हे राजकीय नेत्यांची खरीच सभास्थळे झालेले आहेत. अगदी दहा-बारा नेत्यांची आमदार,माजी आमदार,खासदार,माजी खासदार, विविध पक्षाचे पदाधिकारी, सभापती यांची लांबलचक भाषणे होतात. त्यामध्ये आमदार व इतर नेते भाषण करतात.

त्यांची भाषणे लांबलचक पाल्हाळ लावणारी असतात.भाषण करणारे नेते देश,राज्य पातळीवरील विषय येथे मांडतात.त्यामुळे समोर बसलेले उपस्थित, मृत व्यक्तीचे नातेवाईक सारेच कंटाळतात. एका तासाचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम अगदी दोन-तीन तास चालतो.

त्यामुळे सकाळचे दहा साडेदहा वाजले तरी दशक्रिया विधीचा कार्यक्रम उरकत नाही. काकस्पर्श होऊन गेला तरी भाषणबाजी सुरूच असते.काही प्रवचनकारही टीकाटिप्पणी करतात. प्रवचनकार विनोद करतात आणि उपस्थितांना हसवण्याचा प्रयत्न करतात.

काही प्रवचनकारांचे पाकिटाशिवाय काही चालत नाही. जी मृतव्यक्ती आहे त्याचे कुटुंबीय, नातेवाईक, काही मंदिर, संस्था, शाळा यांना देणग्या म्हणून काही रक्कमेची पाकीट देत असतात ती पाकीटे देण्याचा कार्यक्रमही मान्यवरांच्या हस्ते होतो.

यालाही मोठा वेळ लागतो. याला आवर घालण्याची गरज आहे. दशक्रिया विधी कार्यक्रमात एक-दोन राजकीय व्यक्तींनी प्रतिनिधी स्वरूपात बोलणे उचित आहे.परंतु अगदी दहा ते बारा जण बोलतात.ही भाषण बाजी कंटाळा आणणारी असते.

त्यामुळे उपस्थित, मृत व्यक्तीचे कुटुंब, नातेवाईक अक्षरशः कंटाळतात. सकाळ च्या उन्हाचा तडाखा ही उपस्थितांना बसतो. त्यामुळे उपस्थित कंटाळून कसेबसे या दशक्रिया विधीला उपस्थिती दाखवतात.

मृताचे नातेवाईकही दशक्रिया विधीला राजकीय नेत्यांनी आले पाहिजे त्यासाठी वारंवार त्यांना फोनाफोनी करतात. विविध पक्षाचा आमदार, माजी आमदार, खासदार, कार्यकर्ता, पदाधिकारी, मान्यवर वेळेवर आला नाही तोपर्यंत संयोजक, निवेदक त्यांची वाट पाहत असतो.

तोपर्यंत दुसऱ्या मान्यवरांना भाषणाची संधी देऊन शेवटी संबंधित नेत्याचे भाषण ठेवतो. यात बराच वेळ जातो. काही राजकीय नेते एका दिवशी चार ते पाच दशक्रिया विधी च्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतात.त्यामुळे त्यांचाही वेळ उपस्थितीसाठी बराच जातो.

काही राजकीय नेते येण्यासाठी मृताचे नातेवाईक, संयोजक, निवेदक वाट पाहत असतात. काही राजकीय नेत्यांच्या उपस्थितीशिवाय दशक्रिया विधीचा कार्यक्रम त्यांच्या दृष्टीने अपूर्णच असतो. म्हणून ते राजकीय नेते आले त्यांची भाषण बाजी झाली की दशक्रिया विधी कार्यक्रम आटोपला जातो.

राजकीय नेत्यांची भाषणबाजी

विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांना, पदाधिकारी कार्यकर्त्यांना मृत व्यक्ती बद्दल, त्याच्या कुटुंबाबद्दल विचार व्यक्त करण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी निवेदक उठवतो.काही राजकीय व्यक्ती, नेते पाल्हाळपणे भाषण करतात.

तर काही राजकीय व्यक्ती, नेते अगदी दोन-तीन मिनिटात भाषण आटोपतात. काहीजण अगदी पंधरा-वीस मिनिटे, अर्धा तास भाषणबाजीत घालवतात. चाकणला दशक्रिया विधीच्या ठिकाणी असे अनेक नेते, काही आमदार कार्यकर्ते उपस्थित राहून भाषण बाजी करतात.

तेथे एकमेकांविरोधात टोलेबाजी चालते. प्रतिनिधी स्वरूपात एक, दोन व्यक्तींनी श्रद्धांजलीपर भाषण करणे योग्य आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे. काहीजण तर बोलून नाही दिले तर संयोजक,

निवेदकावर रागावतात. काहीजण कोणाला बोलायला संधी द्यायची यावरून हट्ट धरतात. अगदी दिवाळीच्या सणात तर काही राजकीय व्यक्तींनी, पदाधिकाऱ्यांनी मृत व्यक्तीच्या दशक्रिया विधी मध्ये चक्क दिवाळीचे मिठाईचे पुढेही वाटले.त्यामुळे दुःख कोणाला आहे हेही कळत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

SCROLL FOR NEXT