शिरूर लोकसभा मतदारसंघातून दत्ता गांजाळे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील Sakal
पुणे

Shirur Lok Sabha constituency : शिरूर लोकसभा मतदारसंघातून दत्ता गांजाळे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील

आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाची बैठक मंचर येथे झाली. शिरूर लोकसभा मतदारसंघातून मंचर चे आदर्श सरपंच पुरस्कार विजेते दत्ता गांजाळे यांनी निवडणूक लढवावी.

डी. के वळसे पाटील

मंचर : आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाची बैठक मंचर येथे झाली. शिरूर लोकसभा मतदारसंघातून मंचर चे आदर्श सरपंच पुरस्कार विजेते दत्ता गांजाळे यांनी निवडणूक लढवावी.असा ठराव एकमताने मंजूरकरण्यात आला. यावेळी टाळ्यांचा कडकडाट करण्यात आला.

एक मराठा लाख मराठा अशा उत्स्फूर्त पणे घोषणा देण्यात आल्या यावेळी आखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंकुश लांडे पाटील, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड सुनील बांगर, गणेश खानदेशे, वसंतराव बाणखेले , सरपंच दीपक पोखरकर, उपस्थित होते राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांची नावे सकल मराठा समाजाच्या वतीने मागविण्यात आली आहेत.

त्यानुसार आंबेगाव तालुक्यातून गांजाळे यांच्या नावावर एकमताने शिक्का मोर्तब करण्यात आले. असे राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड सुनील बांगर व सकल मराठा समाजाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अंकुश लांडे पाटील यांनी सांगितले.

प्रा.सौरभ शिंदे, बाबाजी चासकर, , विजयराव पवार, दत्तात्रय खिलारी,अजय मुळूक, रोहित नाईकडे व दत्ता गांजाळेयांनी शिरूर लोकसभानिवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे सांगितले .सर्व नावांवर अत्यंत शांततेने चर्चा करण्यात आली.

त्यानंतर मंचर शहरात सरपंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी केलेले व आंबेगाव खेड जुन्नर शिरूर भोसरी हडपसर या मतदारसंघातील सर्व भागात मोठा जनसंपर्क असलेले दत्ता गांजाळे यांचे नावावर एकमत झाले असे वसंतराव बाणखेले यांनी सांगितले.

शिरूर मतदार संघातून उमेदवारी देत असताना भोसरी, हडपसर, खेड, शिरूर, जुन्नर, तालुक्यातील मराठा समाजातील इच्छुकांची नावे विचारात घेतली जाणार आहेत. अंतिम निर्णय संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील घेणार आहेत. जरांगे पाटील यांची भेट घेऊन गांजाळे यांच्याउमेदवारीची मागणी केली जाणार आहे, असे विजयराव पवार यांनी सांगितले.

यावेळी श्रीराम बांगर योगेश बांगर कुणाल वानखेडे अभिषेक निगुड संजय चिंचपुरे परशुराम बेके ॲड श्याम सावंत सचिन वायाळ संतोष मिसाळ नामदेव गुंजाळ अनिल भोर प्रदीप शिंदे रामदास कराळे संजय शिंदे आदी कार्यकर्त्यांनी चर्चेत भाग घेतला आशिष घोलप यांनी आभार मानले. बैठक शांततेचे व खेळीमेळीच्यावातावरणात पार पडली.

मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे त्यामुळे मराठा समाज बांधवांच्या भावना तीव्र आहेत. लोकसभेत मराठा समाजाचे प्रश्न पोट तिडकेने मांडणारा खासदार या भागातील जनतेला हवा आहे. उमेदवारीसाठी एक मताने आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाने माझ्या नावाचा ठराव मंजूर केल्याबद्दल मी ऋणी आहे.

जुन्नर तालुक्यातील मराठा सकल समाजाच्या कार्यकर्त्यांनी माझ्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. उमेदवारी मिळाल्यास मराठा समाजाचे नेते मनोज जारंगे पाटील यांच्या जाहीर सभांचे आयोजन आंबेगाव शिरूर खेड जुन्नर हडपसर भोसरी भागात केले जाईल . संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढणार आहे . माझ्या प्रचारासाठी मराठा बांधव जीवाचे रान करतील असा मला विश्वास आहे.

- दत्ता गांजाळे आदर्श सरपंच पुरस्कार विजेते मंचर ता आंबेगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT