daund murder case Further investigations will conducted based on post-mortem reports sunil fulari  sakal
पुणे

Pune News : शवविच्छेदनाच्या दोन्ही अहवालांच्या निष्कर्षावरून पुढील तपास होणार

पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची माहिती.....

रमेश वत्रे

केडगाव : पारगाव ( ता.दौंड ) येथील हत्याकांडातील पहिला व नंतरच्या शवविच्छेदन अहवालाची छाननी करण्यात येईल. दोन्ही अहवालांच्या निष्कर्षावरून पुढील तपास केला जाईल. अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आज पारगाव ( ता.दौंड ) येथे दिली.

पारगाव येथे भीमा नदीपात्रात एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह मागील आठवड्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या आत्महत्या आहेत की हत्या याबाबत प्रारंभी संभ्रम होता. यवत येथील वैद्यकीय अधिका-यांकडून पाण्यात बुडून मृत्यू असा शवविच्छेदन अहवाल दिला होता. मात्र नातेवाईकांकडूनच हे हत्याकांड झाल्याचे तपासात समोर आल्याने या घटनेने मोठे वळण घेतले.

त्यामुळे दफन केलेल्या राणी फुलवरे, शाम फुलवरे, संगिता पवार यांचे मृतदेह पुन्हा बाहेर काढून त्यांचे न्याय सहायक तज्ञ समितीव्दारे फेर शवविच्छेदन करण्यात आले. यागुन्ह्यात एका अल्पवयीनसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन आज पाहणी केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ''पारगाव हत्याकांडात मेडिकल लिगल आणि फोरेन्सिक सायन्सच्या टिमची मदत घेण्यात आलेली आहे. सायबर फोरेन्सिक व डिजिटल फोरेन्सिक यांची मदत घेतली जाणर आहे.

एकंदरीत घटनाक्रम, त्यांच्या वेळा, त्याची सुसंगती, आरोपींचा सहभाग, प्रत्येकाची भूमिका याबाबत बारकाईने छाननी करण्यात येणार आहे. मृतदेहावरील जखमा, त्याचा व्हिसेरा आणि शास्त्रोक्त तपासणीचे अहवाल आमच्या तपास अधिका-याला प्राप्त होतील. या गुन्ह्यात आणखी कोणी सहाय्य केले आहे का याबाबत तपास चालू आहे.''

यावेळी पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, पोलिस निरीक्षक अविनाश शिळिमकर, पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे उपस्थित होते. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस पुढील तपास करत आहे.

फेर शवविच्छेदन अहवालाची उत्सुकता

यवत येथील वैद्यकीय अधिका-यांचा शवविच्छेदन अहवाल व पोलिसांचा तपास या दोन टोकाच्या गोष्टी तपासात पुढे आल्या आहेत. दफन केलेल्या तीन मृतदेहांचे फेर शवविच्छेदन करण्यात आले आहे. आरोग्य खात्याकडून त्यातील ज्या त्रुटी आहेत त्यावर सविस्तर उत्तर घेण्यात येणार आहे. ससूनचे अधिष्ठाता या अहवालांची छाननी करत आहेत. त्यामुळे ससूनचा अहवाल काय येईल याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Cha.Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT