Daund Police Station Sakal
पुणे

Police Officer Transfer : दौंड - पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली

दौंडचे पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे यांची तडकाफडकी पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

प्रफुल्ल भंडारी

दौंडचे पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे यांची तडकाफडकी पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

दौंड - दौंडचे पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे यांची तडकाफडकी पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. आमदार नितेश राणे यांनी अॅट्रॉसिटी व विनयभंग प्रकरणातील फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना ४८ तासांचा कालावधी देत पोलिसांवर गंभीर आरोप केल्यानंतर ही बदली झाली आहे.

पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक अंकित गोयल यांनी एका आदेशाद्वारे विनोद घुगे यांची मुख्यालयात नियंत्रण कक्षात बदली केली आहे. दौंड पोलिस ठाण्याचा तात्पुरता प्रभार निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. अवघ्या १४ महिन्यात श्री. घुगे यांची बदली झाली.

दौंड शहरातीत तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास तब्बल २१ दिवसांचा विलंब केला होता. पीडितेच्या फिर्यादीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता व दौंड नगरपालिकेचा माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याच्यासह एकूण २० जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, विनयभंग, बेकायदा शस्त्र बाळगणे, दंगल करणे, आदी गुन्हे ९ नोव्हेंबर रोजी दाखल केले. परंतु पोलिसांनी अद्यापपर्यंत आरोपींना अटक न केल्याने आमदार नितेश राणे यांनी १७ नोव्हेंबर रोजी पीडित कुटुंबाची भेट घेऊन पोलिस अधिकाऱ्यांना दौंड पोलिस ठाण्यात जाऊन जाब विचारला होता. तसेच आरोपींना अटक न करण्यामागील पोलिसांच्या भूमिकेची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी श्री. राणे यांनी केली होती.

दौंड पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच शंका घेत फरार आरोपींसमवेत काही पोलिस अधिकार्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचा गंभीर आरोप श्री. राणे यांनी केल्यानंतर बदली झाली.

विलंब भोवला

विनयभंग व अॅट्रोसिटी प्रकरणात दौंड पोलिसांनी सुरवातीला फिर्याद नसल्याचे कारण देत गुन्हा दाखल केला नाही. २१ दिवसांच्या विलंबाने गुन्हा दाखल केला. मात्र बादशहा शेख याच्यासह एकूण २० आरोपींपैकी फक्त एकाला अटक केल्याने पोलिसांची सुरवातीपासूनची सौम्य भूमिका शंकास्पद ठरली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाविकास आघाडीकडून व्होट जिहादचे काम; आता एक व्हावं लागेल'

Latest Maharashtra News Updates live : छत्तीसगढच्या कांकेरमध्ये ५ नक्सलवाद्यांचा खात्मा

Government Job : सरकारी नोकरी मिळवण्याचे सोपे मार्ग: भारतातील ९ सर्वात सोप्या सरकारी परीक्षा

Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

'बिग बॉस १८' मध्ये सलमानने घेतली अश्नीर ग्रोवरची शाळा; दोगलापन वाल्या डायलॉगवर भाईजान नाराज

SCROLL FOR NEXT