10th Exam result Daund esakal
पुणे

10th Exam Result : दौंड तालुक्याचा दहावीचा निकाल 93.78 टक्के; यंदाही निकालात मुलींचंच वर्चस्व

प्रफुल्ल भंडारी

निकालात पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून परीक्षा दिलेल्या ५३७३ विद्यार्थ्यांपैकी ५०३९ जण उत्तीर्ण झाले आहेत.

दौंड : दौंड तालुक्यात (Daund) दहावीच्या परीक्षेचा सरासरी निकाल (10th Exam Result) ९३. ७८ टक्के इतका लागला आहे. तालुक्यात उत्तीर्णांपैकी मुलींचे प्रमाण ९६.०५ टक्के, तर मुलांचे प्रमाण ९१. ७५ टक्के इतके आहे. तालु्क्यातील ८२ विद्यालयांपैकी २७ विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra Board of Education) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा जाहीर झालेल्या निकालात पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून परीक्षा दिलेल्या ५३७३ विद्यार्थ्यांपैकी ५०३९ जण उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी विशेष प्राविण्य गटात १४९८, प्रथम श्रेणी गटात १८८९ , द्वितीय श्रेणी गटात १२७४ व उत्तीर्ण गटात ०३७८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे.

100 टक्के निकाल लागलेली विद्यालये

सेंट सेबॅस्टियन हायस्कूल (दौंड), दत्तकला इंटरनॅशनल स्कूल (स्वामी चिंचोली), श्रीराम विद्यालय (स्वामी चिंचोली), राज्य राखीव पोलिस पब्लिक विद्यालय (दौंड), नवीन माध्यमिक विद्यालय (मळद), एम. व्ही. भागवत विद्यालय (पाटस), आदर्श विद्यालय (वडगाव बांडे), श्री भैरवनाथ विद्यालय (खोर) , जिजामाता विद्यालय (गोपाळवाडी ) , शारदा विद्यालय (सहजपूर), सुरजबाई कटारिया विद्यालय (काळेवाडी), न्यू इंग्लिश स्कूल (नानगाव) , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय (दौंड), श्रीराम विद्यालय (पडवी).

तसेच उस्मान अली शाब्दी उुर्दू विद्यालय (दौंड), मेरी मेमोरियल स्कूल (गिरीम), श्री मंगेश मेमोरियल स्कूल (लिंगाळी) , मदरसा इमामदूल उलूम युसूफिया उर्दु स्कूल (दौंड),अमोल विद्यालय (दौंड ), मनोरमा इंग्लिश मिडियम स्कूल (केडगाव), जेधे विद्यालय (बोरीपार्धी) , सेंट तेरेसा विद्यालय (यवत), दत्तकला स्कूल (दौंड), लर्न अॅण्ड प्ले स्कूल (दौंड), संस्कार स्कूल (दौंड), ज्ञानराज पब्लिक (दौंड), ब्राइट फ्यूचर (खडकी).

९५ ते ९९ टक्के निकाल लागलेली विद्यालये

न्यू इंग्लिश स्कूल (खामगाव) - ९९.२०, श्री फिरंगाईमाता विद्यालय (कुरकुंभ) - ९८.९५ , श्री भैरवनाथ विद्यालय (खडकी) - ९८.५९, मेरी मेमोरियल विद्यालय (पाटस) - ९८.४३, त्रिंबक दिवेकर विद्यालय (कडेठाण) - ९८.११, जयहिंद विद्यालय (कासुर्डी) - ९८.०९, नागनाथ विद्यालय (वरवंड)- ९७. ७२, सरस्वती विद्यालय (रावणगाव) - ९७.७०, श्री सिध्देश्वर विद्यालय (पिंपळगाव) - ९७. ६७, राजेभोसले विद्यालय (खानवटे) - ९७.५६, स्व. सुभाषअण्णा कुल विद्यालय (काळेवाडी) - ९७.४३, आलेश्वर माध्यमिक विद्यालय (आलेगाव) - ९७.०५, श्री सदगुरू विद्यालय (देऊळगाव गाडा) - ९६.९६, भैरवनाथ विद्यालय (गिरीम) - ९६.७७ , श्री जयमल्हार विद्यालय (देलवडी) - ९६.६६, सुभाषअण्णा कुल विद्यालय (वाटलूज) - ९६.५५ ,न्यू इंग्लिश स्कूल (पारगाव सालू मालू ) - ९५ .९१, श्रीयोग माध्यमिक विद्यालय (बेटवाडी) - ९५ .९१, मनोरमा मेमोरियल गर्ल्स हायस्कूल (केडगाव) - ९५ .७७, स्व. भाऊसाहेब भागवत विद्यालय (माळवाडी) - ९५ .७१, राजेश्वर विद्यालय (राजेगाव) - ९५ .३१.

निकालाचा टक्का घसरला

२०२२ मध्ये दहावीच्या परीक्षेचा शेकडा निकाल ९६. ७८ टक्के इतका लागला होता व एकोणपन्नास विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला होता. सन २०२३ मध्ये दहावीचा सरासरी शेकडा निकाल ९४.४० टक्के निकाल लागला होता व बावीस विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला होता. तर यंदा सरासरी ९३.७८ निकाल टक्के लागला सत्तावीस विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT