dcm ajit pawar look into chakan traffic problem order to remove encroachment pune Sakal
पुणे

Chakan Traffic : चाकणच्या वाहतूक कोंडीबाबत उपमुख्यमंत्र्यांनी घातले लक्ष; अतिक्रमणे काढण्याचे निर्देश

चाकणच्या वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत तसेच चाकण -तळेगाव- शिक्रापूर, पुणे -नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथे आज बैठक

हरिदास कड

चाकण :चाकणच्या वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत तसेच चाकण -तळेगाव- शिक्रापूर, पुणे -नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथे आज बैठक घेऊन लक्ष घातले.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चाकण -तळेगाव -शिक्रापूर तसेच पुणे- नाशिक महामार्गावरील अतिक्रमणे काढण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अतिक्रमणे काढून रस्ता खुला करण्यात यावा व रस्त्याची रुंदी वाढविण्यात यावी समस्या दूर करण्यात याव्यात असे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकण, ता. खेड येथील मार्गांवरील व औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडीबाबत तसेच चाकण येथील चाकण -तळेगाव- शिक्रापूर या मार्गाच्या दुरावस्थेबाबत आमदार दिलीप मोहिते तसेच (एनएचएआय ) राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण चे वरिष्ठ अधिकारी,महसूल विभागाचे अधिकारी,जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाचे अधिकारी,संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक घेतली.

या बैठकीत खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी चाकण येथील वाहतूक कोंडीबाबत आंदोलकांची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्पष्ट केली.आंदोलकांची भूमिका ही वाहतूक कोंडी सोडविणे अशी आहे वाहतूक कोंडी न होण्यासाठी त्यावरील अतिक्रमणे ही काढणे गरजेचे आहे.

रस्त्याची कामे करणे महत्वाचे आहे असे आंदोलकांची भूमिका आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितले. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांना सांगून या मार्गावरील अतिक्रमणे त्वरित काढण्यात यावीत तसेच रस्ता खुला करण्यात यावा तसेच त्याची दुरुस्ती करण्यात यावी असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

एनएचएआयच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले की,चाकण -तळेगाव-शिक्रापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. पाणी काढण्यासाठी शेजारील लोक जागा देत नाहीत . मार्गावर नागरिकांची अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात आहेत.सुमारे दहा कोटी चा निधी पडून आहे परंतु तो काही लोकांच्या विरोधामुळे तसाच पडून आहे.

नागरिक कामे करून देत नाहीत. अतिक्रमणे काढायची म्हटले तर पोलीस अधिकारी बंदोबस्त देत नाही.त्यामुळे अतिक्रमणे काढली जात नाही.यावेळीनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता,सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे,विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार,

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे विभागीय अधिकारी अंशुमन श्रीवास्तव, पीएमआरडी ए चे आयुक्त योगेश म्हसे ,जिल्हाधिकारी सुहास दिवसे,संबंधित अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाचे अधिकारी , एमआयडीसीचे अधिकारी,पोलीस अधिकारी यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या.

आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले की, " चाकण परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न तीव्र झालेला आहे. आंदोलक वाहतूक कोंडीच्या समस्येला प्रशासन,पुढारी व पोलीस यांना जबाबदार धरत आहेत. वाहतूक कोंडी व रस्त्याचे प्रश्न तात्काळ सुटणे गरजेचे आहे. आंदोलकांची मागणी अतिक्रमणे काढावी अशी आहे.

मार्ग खुले करावेत वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा असे नागरिकांचे,आंदोलकांचे म्हणणे आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चाकण परिसरातील चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तात्काळ मार्गावरील अतिक्रमणे काढणे महत्वाचे आहे असे सांगितले.अतिक्रमण काढण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. पुणे -नाशिक महामार्गावरील स्पायसर चौक ते एमआयडीसी मार्ग सहा पदरी करण्याचे उपमुख्यमंत्री यांनी निर्देश दिले.

चाकण परिसरात मोठ्या प्रमाणात चाकण -शिक्रापूर,चाकण- तळेगाव, पुणे -नाशिक महामार्गावर अतिक्रमणे आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झालेला आहे. या मार्गावर अनेक अवैध रिक्षा धावतात. कंपनीच्या कामगारांची ने -आण करणाऱ्या खासगी बसेस धावतात. अस्ताव्यस्त वाहने लावली जातात.अवजड वाहने धावतात.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. रस्ते अगदी वीस-पंचवीस फूट रुंदीचे झालेले आहेत. रस्ते खुले करण्यासाठी प्रत्येक मार्गावरील अतिक्रमणे काढावीत अशी नागरिकांची, आंदोलकांची भूमिका आहे.

ओढ्यावर काही बड्या धेंडानी नागरिकांनी ओढे बुजवून अतिक्रमणे केली आहेत. चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या मागील ओढ्यावर तसेच तळेगाव चौकात पत्र्याची शेड टाकून ओढा पूर्णपणे बुजविण्यात आलेला आहे.ओढ्यावर इमारती बांधलेल्या आहेत त्यामुळे ओढ्याचे पाणी कसे जाणार,कोठे जाणार हा प्रश्न आहे.

चाकण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी नवीन रस्त्याची कामे करण्यासाठी 179 कोटीचा निधी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे.या निधीचा वापर करून गतीने कामे करून घ्यावीत औद्योगिक परिसरातील कचऱ्यासह आसपासच्या 17 गावांमध्ये कचरा व्यवस्था आणि परिसरात प्रक्रिया करण्यासाठी एमआयडीसी ने चार एकर जागा उपलब्ध करून द्यावी.

या जागेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कचरा प्रक्रिया केंद्र उभे करावे.येलवाडी येथे गायरान जमिनीत तसेच फोक्सवॅगन कंपनीच्या समोरील पाझर तलावाच्या जागेत ट्रक टर्मिनल्स उभारण्यात यावे. अवजड वाहनांसाठी ट्रक टर्मिनल्स असल्यास रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार नाही.

याबाबत आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले की, " खासदार पुणे -नाशिक महामार्गाच्या तसेच चाकण- तळेगाव -शिक्रापूर या मार्गाच्या कामाबाबत काही करत नाहीत.जुने फोटो प्रसिद्ध करून मी गडकरींना भेटलो असे सांगतात. त्यामुळे नागरिकात वेगळा संभ्रम निर्माण होत आहे.

चाकण-तळेगाव -शिक्रापूर या रस्त्याचे काम केंद्र सरकारच्या वतीने करण्यात येणार होते. या रस्त्याच्या निविदाही प्रसिद्ध होणार होत्या.परंतु केंद्राने हा रस्ता राज्य सरकारने ताब्यात घ्यावा याचा प्रस्ताव दिलेला आहे.या प्रस्तावाला आमचा विरोध आहे.उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा या प्रस्तावाला विरोध केलेला आहे.केंद्र सरकारने तळेगाव -चाकण -शिक्रापूर या मार्गाचे काम त्वरित करावे अशी मागणी आहे.

जिल्हाधिकारी व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांनी चाकण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या पहावी, पाहणी करावी तळेगाव चौकातील पाहणी करावी असे निर्देश देण्यात आले. मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकणच्या वाहतूक कोंडीबाबत तसेच चाकण- तळेगाव -शिक्रापूर या मार्गाच्या कामाबाबत आमदार दिलीप मोहिते व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सखोल चर्चा करून निर्देश दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT