Nikhil Wagle Attack Pune  Sakal
पुणे

Nikhil Wagle Attack Pune : ‘मला ठार करायला फडणवीस यांनीच माणसे पाठवली’; निखिल वागळे यांचा आरोप

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचा आरोप, उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

Pune News : ‘‘शहरात आमच्यावर झालेल्या हल्ल्यास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत. मला ठार करायला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच माणसे पाठवली,’’ असा गंभीर आरोप ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केला. सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून हा भ्याड हल्ला झाला आहे. फडणवीस यांनी निषेध करण्याऐवजी हल्लेखोर कार्यकर्त्यांना अटक करून दाखवावी, तसेच उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

साने गुरुजी स्मारकाच्या सभागृहात शुक्रवारी झालेल्या ‘निर्भय बनो’ सभेनंतर वागळे पत्रकारांशी बोलत होते. वागळे म्हणाले, ‘‘पोलिसांनी आम्हाला सभेला जाण्यापूर्वी ॲड. असीम सरोदे यांच्या घरी सुमारे चार तास नजरकैदेत ठेवले.

आमच्यावर हा हल्ला होणार हे पोलिसांना माहीत होते. आमच्या मोटारीवर चार-पाच ठिकाणी दगडांनी आणि काठ्यांनी हल्ला झाला. अंडी आणि निळी शाई फेकली. परंतु या घटनेमुळे आम्ही घाबरलेलो नाही. लोकशाही वाचविण्यासाठी जीव गेला तरी चालेल. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हा भ्याड हल्ला झाला आहे.

असा हल्ला होणे ही शरमेची बाब आहे. भाजप फॅसिस्ट पक्ष आहे. त्यांना आम्हाला आज ठार मारायचे आहेत, परंतु त्यांना शक्य झाले नाही. आम्ही शाहू-फुले-आंबेडकरी मार्गाने जात आहोत, म्हणून वाचलो. यापुढेही आम्ही फॅसिझमचा मुकाबला करू.’’

‘‘भाजपच्या शहराध्यक्षांनी ही सभा उधळून लावण्याची धमकी दिली होती. तरीही पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही. आम्ही आज नशिबाने वाचलो. भाजप हा दहशतवादी पक्ष आहे. भाजप आणि पोलिसांचे संगनमत असून, या घटनेला पोलिसही तेवढेच जबाबदार आहेत,’’ असा गंभीर आरोप वागळे यांनी केला.

हल्लेखोरांना अटक करा

खासगी सभागृहात सभा असल्यामुळे पोलिस परवानगीची गरज नव्हती. प्रक्षोभक बोलता येणार नाही, अशी आम्हाला पोलिसांनी नोटीस देण्यात आली. पोलिस राजकीय दबावाखाली होते. या हल्ल्यात ॲड. बाळकृष्ण निढाळकर यांच्या मोटारीचीही तोडफोड करण्यात आली. हल्लेखोरांना अटक करण्यात यावी, अशी मागणी ॲड. असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांनी केली. आम्ही ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांसमवेत उघडपणे सोबत आहोत, असे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT