Nimbut Firing Case
Nimbut Firing Case esakal
पुणे

रणजित निंबाळकरांचा गोळीबारात मृत्यू; 700 ते 800 लोकांचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या, गौतम काकडेंच्या अटकेची मागणी, काय आहे प्रकरण?

सकाळ डिजिटल टीम

गौतम काकडे यांचे बंधू गौरव यांनी पिस्तूलातून थेट रणजित यांच्या डोक्यात गोळी झाडली. आज पहाटे रणजीत यांचा मृत्यू झाला.

सोमेश्वरनगर / वडगाव निंबाळकर : निंबुत (ता. बारामती) येथील गोळीबार प्रकरणातील (Nimbut Firing Case) जखमी रणजित निंबाळकर (Ranjit Nimbalkar) यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे बैलगाडा क्षेत्रातील चाहते आणि नातेवाईक संतप्त झाले आहेत. सुमारे सातशे ते आठशे लोकांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याकडे (Vadgaon Nimbalkar Police Station) धाव घेतली. पोलिस ठाण्यापुढे ठिय्या मारत फरार आरोपी गौतम काकडे यांना त्वरित अटक करून कठोर शासन करण्याची मागणी केली.

पोलिसांनी शंभर टक्के कठोर कारवाई करण्याचे जमावाला आश्वासन दिले असून शांतता राखण्याचे अवाहन केले आहे. बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) क्षेत्रातील गौतम काकडे यांनी फलटण येथील रणजीत निंबाळकर यांचा 'सुंदर' नावाचा बैल सोमवारी पाच लाख रुपये इसार देऊन खरेदी केला होता. मंगळवारी रात्री उर्वरित रक्कम नेण्यासाठी बोलावले होते. निंबाळकर हे पत्नी, मुलगी, दोन मित्रांसह पैसे गौतम काकडे यांच्या घरी गेले. घरासमोर चर्चेतून वादावादी झाली.

याप्रसंगी गौतम काकडे यांचे बंधू गौरव यांनी पिस्तूलातून थेट रणजित यांच्या डोक्यात गोळी झाडली. आज पहाटे रणजीत यांचा मृत्यू झाला. ही बातमी दिवसभर बारामती आणि फलटण तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. बैलगाडा क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या निंबाळकर यांचे चाहते संतप्त झाले आहेत. शेकडो लोकांनी फलटण पोलीस ठाण्यासमोर धाव घेतली. गौतम काकडे यांना अटक झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या.

दरम्यान, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यावरही निंबाळकर यांचे नातेवाईक व बैलगाडा शर्यत प्रेमींनी दुपारी मोठी गर्दी केली. दोननंतर जमाव सात-आठशेपर्यंत पोहोचला. पोलीस ठाण्यासमोरच बैठक मारत जमावाने आपल्या भावना व्यक्त केल्या. रणजित यांची पत्नी अंकिता, वडील एकनाथ हेही जमवासोबत होते. याप्रसंगी एक नातेवाईक महिलेने, "पोलिसांना जमत नसेल तर आम्ही न्याय करू" असा इशारा दिला. तर काही तरुणांनी, "गौतम काकडे यांना आजच्या आज अटक करून कठोरातील कठोर शासन करा. सुन्दर बैल ताब्यात द्या." अशी मागणी केली.

बैलगाडा प्रेमींनीही या घटनेचा निषेध केला आहे. सुंदर नावाचा बैल परत द्यावा अशीही मागणी करण्यात आली. वडील एकनाथ निंबाळकर, मित्र सचिन श्रीरंग देशमुख, भावजय कोमल निंबाळकर, चुलती संगीता निंबाळकर, मित्र सलीम शेख यांनीही शोकाकुल अवस्थेत संतप्त भावना व्यक्त केल्या. पत्नी अंकिता यांनी, आम्ही परत फिरत असताना त्यांनी नऊ महिन्याच्या मुलीसमोर पतीवर गोळी घातली, असे रडत रडत सांगितले. तसेच सोशल मीडियावर देखील या घटनेवर संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी राहुल घुगे यांनी समोरे जात जमावाची यशस्वीपणे समजूत घातली. तसेच "गुन्हेगारांवर शंभर टक्के कठोर कारवाई होईल. आम्हाला तपास करू द्या. महत्त्वाचा वेळ जाऊ देऊ नका, अशी विनंती केली." तसेच शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

K Armstrong: कोण होते तामिळनाडू बसपा प्रमुख आर्मस्ट्राँग? ज्यांची भररस्त्यात झाली हत्या

Ashadhi Palkhi Sohala : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींनंतर CM शिंदे प्रथमच आषाढी यात्रेत वाखरी ते पंढरपूर चालणार

Anant & Radhika Sangeet : अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला सलमानचा धमाकेदार परफॉर्मन्स ; स्टारकिड्सनीही केला डान्स

Molestation Of School Girl In Akola: शालेय पोषण आहार बनवणाऱ्या व्यक्तीचा 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

Maharashtra Live News Updates : घड्याळ कुणाचं? 16 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी

SCROLL FOR NEXT