Dehugaon 
पुणे

देहूचा पालिकेत समावेश नको नगरपंचायत करा

सकाळवृत्तसेवा

देहू - देहूचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करू नये, तसेच देहूची स्वतंत्र नगरपंचायत करावी, अशी मागणी देहूतील नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नगरपंचायतीसाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे.

देहूचे स्वतंत्र अस्तित्व राहावे यासाठी गेले तीन वर्षांपासून सरकारकडे पत्रव्यवहार सुरू आहे. तसेच दोन वर्षांपूर्वी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाकडे जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी नगरपंचायत होण्यासाठी  ऑगस्ट २०१७ ला प्रस्ताव पाठविलेला आहे. मात्र, त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने महासभेत ठराव करून देहू पालिकेत घेण्याचा विषय मंजूर केलेला आहे. हा विषय देहूतील नागरिकांना विचारात न घेता केला आहे. त्यामुळे देहूचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत न करता देहूची स्वतंत्र नगरपंचायत करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माऊली काळोखे यांनी निवेदन दिले आहे.

देहूतील नागरिकांमध्ये संभ्रमावस्था
पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेशाबाबत देहूतील नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा आहे. काही नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले, तर काहींनी त्याला जोरदार विरोध केला. सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

सांगवडेकरांचाही तीव्र विरोध
सोमाटणे - पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेशाला सांगवडे ग्रामपंचायतीचा विरोध कायम असून, विकासाच्या नावाखावी जमिनी हडपण्याचा डाव सुरू आहे. महापालिकेत सांगवडेच्या समावेशाच्या हालचाली सुरू होताच सांगवडे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. समावेशाला तीव्र विरोध करण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे केला आहे.

तालुक्‍यातील सर्वाधिक सुपीक जमिनीचे गाव म्हणून सांगवडे गावाची ओळख आहे. शेती व शेतीपूरक दुग्ध व्यवसायावर गावाची उपजीविका चालते. येथील शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरवात केली आहे. गावाची लोकसंख्या दीड हजार आहे. संत तुकाराम सहकारी साखर कारखाना जवळ आल्याने ऊस उत्पादनातून गेल्या पंधरा वर्षात गावांनी चांगली कमाई वाढली आहे. गावात विकासाची गंगा वाहू लागली आहे.

गावाने शासकीय निधी व पदरमोडीतून अंतर्गत रस्ते, नळ पाणी योजना, गटार योजना, मंदिरांचे बांधकाम, सभामंडप, सार्वजनिक शौचालय, पथदिवे, शाळा बांधकाम, ग्रामसचिवालय आदी सर्व कामे पूर्ण केली. गेल्या चार वर्षांत ग्रामपंचायतीने चार वेळा ठरावाद्वारे समावेशाला विरोध दर्शवला असून, गावाचा समावेश केला तर रस्त्यावर उतरू, असा इशारा सरपंच दीपाली लिमण, उपसरपंच अनिल संतोष काळे, मोकाशी, नितीन राक्षे, संतोष राक्षे, अनिता लिमण, सुरेखा जगताप, पार्वती चव्हाण, प्रकाश राक्षे, ज्ञानेश्वर राक्षे, खंडू राक्षे, प्रवीण राक्षे आदींसह ग्रामस्थांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT