Coronavirus Sakal
पुणे

डेल्टा प्लस व्हेरिएशनचा पुणे शहराला बसणार फटका

कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरिएशनचा प्रसार वाढत असल्याने त्याचा फटका पुणे शहराला बसणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या (Corona) नव्या डेल्टा प्लस व्हेरिएशनचा New Delta Plus Variations) प्रसार वाढत असल्याने त्याचा फटका पुणे शहराला (Pune City) बसणार आहे. कोरोना निर्बंधाच्या दुसऱ्या स्तरात असलेल्या पुण्यात आता तिसऱ्या स्तराचे निर्बंध (Restrictions) लागू होणार आहेत. हे आदेश (Order) उद्या (शनिवारी) निघण्याची शक्यता आहे. याचा फटका बाजारपेठेसह मॉल, हॉटेल, कोचिंग क्लासेस यांना बसणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही दुजोरा दिला. (Delta Plus Variations Blow to Pune City Possibility of Issuing New Orders)

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज (शुक्रवारी) घेतलेल्या बैठकीत पुणे शहरात लागू असलेले दुसऱ्या स्तरातील नियम पुढच्या आठवड्यापर्यंत लागू असतील असे स्पष्ट केले होते. मात्र, ही बैठक झाल्यानंतर राज्य सरकारने नवे आदेश काढले आहेत. त्यामध्ये राज्यात तिसऱ्या पेक्षा जास्त स्तराचे निर्बंध लागू करू नयेत असे नमूद केले आहे. त्यामुळे पुण्याचा समावेश आता तिसऱ्या स्तरात होणार आहे.

महापालिकेतील अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता, राज्य सरकारकडून नवे आदेश सायंकाळी प्राप्त झाले आहेत. त्यानुसार शनिवारी नवे आदेश काढले जातील. पुण्यातील बाजारपेठ व इतर व्यवहार बऱ्यापैकी सुरू झाले होते, पण आता या आदेशामुळे निर्बंध लावले जातील, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या बाईक रॅलीला सुरूवात

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

सावधान! व्हॉट्सॲपवर लग्नाची आमंत्रण पत्रिका येताच क्लिक करू नका, नाहीतर होईल मोठी फसवणूक, वाचा 'या' नव्या स्कॅमबद्दल

जिगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

SCROLL FOR NEXT