sakal
पुणे

गॅस एजन्सी व्यवस्थापकास ब्लॅकमेल करून खंडणीची मागणी

ब्लॅकमेल करणाऱ्या तीन कथित पत्रकारांना गुन्हे शाखेकडून अटक

सकाळ डिजिटल टीम

पुणे : गॅस एजन्सीच्या व्यवस्थापकास (Manager) ब्लॅकमेल करून त्याच्याकडे दोन लाख रुपये व पाच हजार रुपये दरमहा हफ्ता अशी खंडणी (Ransom) मागणी करीत त्यापैकी दोन लाख रुपये घेणाऱ्या दोन कथित पत्रकारांना (Journalist) गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. हि कारवाई शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता मार्केट यार्ड येथे करण्यात आली.

सुहास मारुती बनसोडे, मोईन लाडलेसाहेब चौधरी व वसीम अकबर शेख अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी योगेश नागनाथ शिंदे यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शिंदे हे येरवडा येथील शांतीनगर भागात असलेल्या सम्यक इण्डेन गॅस या एजन्सीचे व्यवस्थापक आहेत.

संबंधीत गॅस एजन्सीच्या येथे येऊन नागरीक त्यांच्या वाहनातुन सिलेंडर घेऊन जातात. त्याचे मोईन चौधरी व वसीम शेख या दोघांनी एक महिन्यापुर्वी व्हिडीओ चित्रीकरण केले. तसेच छायाचित्रेही काढली. त्यानंतर संबंधीत व्हिडीओ, छायाचित्रे तक्रारदार शिंदे यांना दाखवून त्यांनी "गॅसची डिलीव्हरी घरपोच करायची असताना, तुम्ही ते करीत नाहीत. त्यामुळे तुमची एजन्सी बंद करण्याबाबतची तक्रार इंडियन ऑइल कंपनीला दिली आहे.

तक्रार मागे घ्यायची असल्यास दोन लाख रुपये द्या तसेच दरमहा पाच हजार रुपये हफ्ता द्या, अशा पद्धतीने सम्यक संपादक पत्रकार संघ, महाराष्ट्रचा अध्यक्ष सुहास बनसोडे, चौधरी व शेख या तिघांनी तक्रारदाराकडे खंडणी मागितली. त्यानुसार त्यांनी खंडणी विरोधी पथकाकडे (क्रमांक दोन) तक्रार अर्ज दिला.

संबंधीत व्यक्तींवर कारवाई करावी, याबाबतचा आदेश मिळाल्यानंतर पोलिसांनी मार्केट यार्ड येथील प्रवेशद्वार क्रमांक नऊ जवळील जीएस टॉवर येथे सापळा लावला. त्यानुसार, बनसोडे, चौधरी व शेख या तिघांना तक्रारदाराकडून दोन लाख रुपयांची खंडणी घेताना पोलिसांनी अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT