पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या विरोधात महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्षांनी महात्मा फुले मंडई येथे निदर्शने करून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा निषेध करून केंद्रीय मंत्रिपदावरून हकालपट्टी करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
राणे यांच्या वक्तव्यामुळे शिवसैनिक सकाळपासूनच आक्रमक झाले होते, महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस सहभागी असल्याने त्यांच्याकडूनही भाजप नेते राणे यांचा निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात आली. यामध्ये शिवसेनेचे शहरप्रमुख किशोर शिंदे, गजानन थरकुडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, अंकुश काकडे, श्याम देशपांडे, प्रदीप देशमुख, किरण साळी आदी यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी नारायण राणे व भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, संध्याकाळी महाविकास आघाडीने आंदोलन केले. राणे यांना केवळ शिवसेनेवर टीका करण्यासाठी केंद्रीय मंत्री केले आहे. बेताल वक्तव्य करणाऱ्या राणे यांची पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.