chhatrapati shivaji maharaj paduka sakal
पुणे

शिवनेरीहून आषाढी वारीसाठी शिवरायांच्या पादुकांचे रायगडाकडे प्रस्थान

राज्यात कोरोना डोके वर काढल्याने केवळ दहाच शिवभक्त पादुका घेऊन प्रस्थान पूजा करुन रवाना झाले.

दत्ता म्हसकर

राज्यात कोरोना डोके वर काढल्याने केवळ दहाच शिवभक्त पादुका घेऊन प्रस्थान पूजा करुन रवाना झाले.

जुन्नर - पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पादुकांनी आज शुक्रवार ता. १० रोजी सकाळी शिवनेरीहून रायगडच्या दिशेने प्रस्थान केले.

श्री शिव छत्रपतींच्या पादुकांवर पवमान अभिषेक व रुद्राभिषेक झाल्यानंतर शिवाई देवीची महापूजा बांधून, महाद्वार पूजन करून हा पालखी सोहळा रायगडाकडे प्रतिकात्मक पायी चालत पुढे वाहनाने मार्गस्थ झाला.

शिवनेरीहून निघालेल्या शिवरायांच्या या पादुका मंचर, खेड, पुणे मार्गे श्री शंभु राजांच्या जन्मभूमीत सासवड परिसरात विसावा घेतील. शनिवारी ता.११ रोजी ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला पुरंदर गडावर शंभुराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करुन पुढे राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडला पोचतील.

राज्यात कोरोना डोके वर काढल्याने केवळ दहाच शिवभक्त शिवाई देवीच्या चरणांशी विसावलेल्या पादुका घेऊन प्रस्थान पूजा करुन रवाना झाले. पालखी सोहळ्याचे समन्वयक डॉ. संदीप महिंद गुरुजी म्हणाले, गेल्या दोनही वर्षी कोरोनाचे निर्बंध पाळत शिवरायांचा पालखी सोहळा रायगडाहून पायीच पंढरपूरला विठुरायाच्या भेटीस गेला होता. आषाढी वारीसाठी निघालेल्या शिवरायांच्या पादुका दरवर्षी शिवनेरी, संग्रामदुर्ग, मल्हारगड, पुरंदर, रायरेश्वर असा प्रवास करून रायगडला जातात. राज्याभिषेकापासून पुढील पाच दिवस रायगडावरच विसावा घेऊन ज्येष्ठ वद्य चतुर्थीला श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात. आषाढी वारी पूर्ण झाल्यानंतर पुढील अकरा महिन्यांच्या कायम वास्तव्यासाठी या पादुका शिवजन्मभूमीत परत येतात. शिवछत्रपतींच्या पादुकांच्या पालखी सोहळ्याचे यंदाचे ८ वे वर्ष तर परंपरेचे २८ वे वर्ष आहे.

शिवाईदेवीच्या चरणांशी असलेल्या पादुका घेऊन जाण्याची संधी यावर्षी रुपेश घुले, संकेत दुट्टे, ओंकार अमृतकर, योगऋषी सुधीर इंगवले यांच्या गटाला मिळाली आहे. स्थानिक पातळीवर संदीप ताजणे, हर्षवर्धन कुऱ्हे, अक्षय कुटे, सागर मोरे, तेजस शिंदे, योगेश वाकचौरे यांनी आवश्यक त्या परवानग्या मिळण्यासाठी परिश्रम घेतले. यासाठी पोलीस, पुरातत्व व वनविभाग विभागाचे अधिकारी व कुसूर ग्रामस्थाचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT