Deputy Chief Minister Ajit Pawar Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala esakal
पुणे

Palkhi Sohala : डोक्यावर टोपी अन् हातात टाळ घेऊन अजितदादांनी पायी चालत पालखी सोहळ्यात घेतला सहभाग; मार्गात कडक पोलिस बंदोबस्त

उपमुख्यमंत्री पालखीत चालणार असल्याने आज कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मिलिंद संगई

राज्यभरातून आलेल्या वारक-यांनी अजित पवार यांच्यासमवेत फोटोसेशनही केले. अजित पवार यांनी टोपी परिधान करुन काही काळ टाळ वाजवून वारक-यांना साथ संगत केली.

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व खासदार सुनेत्रा पवार आज, रविवारी (ता. 7) सकाळीच संत तुकाराम महाराज पालखी (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala) सोहळ्यात पायी चालत सहभागी झाले. मुंबईहून बारामतीला विमानाने आलेले अजित पवार हे थेट विमानतळावरुन मोतीबाग येथे पालखी सोहळ्यात सहभागी झाले. तेथून ते काटेवाडीच्या दिशेने चालत निघाले आहेत.

सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) याही त्यांच्या समवेत निघाल्या आहेत. पायी चालताना अनेक वारकरी, वीणेकरी, पालखी सोहळ्याचे प्रमुख यांनी अजित पवार यांच्याशी संवाद साधला. राज्यभरातून आलेल्या वारक-यांनी अजित पवार यांच्यासमवेत फोटोसेशनही केले. अजित पवार यांनी टोपी परिधान करुन काही काळ टाळ वाजवून वारक-यांना साथ संगत केली.

उपमुख्यमंत्री पालखीत चालणार असल्याने आज कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेक बारामतीकरही आज सकाळपासूनच बारामती ते सणसर हे अंतर चालत जातात, सकाळच्या पूजेनंतर पालखी सोहळा काटेवाडीकडे मार्गस्थ झाला, तेव्हा भाविकांनी जड अंतःकरणाने सोहळ्यास निरोप दिला. दरम्यान, सकाळी बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सपत्निक पूजा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Chh. Sambhajihnagar Election Reslut : घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार, याची उत्सुकता

SCROLL FOR NEXT