ACB sakal
पुणे

Pune Crime : तत्कालीन उपायुक्त नितीन ढगे यांच्यासह पत्नीविरुध्द गुन्हा

‘एसीबी’ने २०२१ मध्ये नितीन ढगे यांच्यावर सापळा रचून कारवाई केली होती.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - तत्कालीन पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त नितीन चंद्रकांत ढगे (वय ४१, रा. रहेजा गार्डन्स, वानवडी) आणि त्यांच्या पत्नीविरुध्द भ्रष्ट मार्गाने सुमारे एक कोटी २९ लाखांची मालमत्ता बाळगल्याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधकच्या (एसीबी) पुणे विभागाने ही कारवाई केली.

पोलिस उपअधीक्षक नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एसीबी’ने २०२१ मध्ये नितीन ढगे यांच्यावर सापळा रचून कारवाई केली होती. त्यावरून वानवडी पोलिस ठाण्यात १६ ऑक्टोबर २०२१ रोजी गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी ढगे यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात एक कोटी २८ लाख ४९ हजार रूपये आढळून आले होते. त्यामुळे त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्यात आली. या चौकशीत नितीन ढगे यांनी २००६ ते २०२१ या कलावधीत एक कोटी २८ लाख ९५ हजार १५० रूपये (ज्ञात उत्पन्नापेक्षा ४७ टक्के जास्त) इतकी मालमत्ता भ्रष्ट मार्गाने मिळविल्याचे निष्पन्न झाले आहे.

तसेच, नितीन ढगे यांना त्यांची पत्नी प्रतिभा ढगे (वय ३५) यांनी प्रोत्साहन दिले, कागदपत्रांमध्ये खोटी माहिती भरून सरकारची फसवणूक केली. याबाबत ‘एसीबी’च्या पोलिस उपअधीक्षक माधुरी भोसले यांनी तक्रार दिली. त्यावरून नितीन ढगे आणि प्रतिभा ढगे यांच्याविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT