शहरातील वाहतूक पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या कारवाईची व त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत ‘सकाळ’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते.
पुणे - सिग्नलला थांबून नियमांचे पालन करणाऱ्या, तर कधी सिग्नल सुटल्यानंतर धावत जाऊन वाहनचालकांना (Vehicle Driver) अडवून कारवाई (Crime) करणाऱ्या, तसेच कोपऱ्या-कोपऱ्यात घोळक्याने उभे राहून सावज टिपणाऱ्या वाहतूक पोलिसांना (Traffic Police) आता वाहतूक पोलिस उपायुक्तांनीच (Traffic Deputy Commissioner) थेट इशारा (Warning) दिला आहे. नागरिकांना कोंडीत पकडून कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांवर आता कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी वाहतूक नियमन करण्यास प्राधान्य द्यायचे आहे, रहदारी नसेल त्याच वेळेला शिस्तीत व नियमानुसार उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करावी, वाहनचालकांशी सौजन्यानेच वागावे, अशी सक्त ताकीद पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी वाहतूक पोलिसांना दिली आहे.
शहरातील वाहतूक पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या कारवाईची व त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत ‘सकाळ’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. संबंधित वृत्त वाचून दोनशे ते तीनशेहून अधिक नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या कारवाईबद्दल त्यांना आलेले अनुभव, तक्रारी ‘सकाळ’कडे मांडल्या. या तक्रारींचीही गांभीर्याने दखल घेत, वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीची सद्यःस्थिती मांडण्यात आली. दरम्यान, संबंधित वृत्त, नागरिकांच्या तक्रारी याची पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी गांभीर्याने दखल घेतली. वाहतूक पोलिसांना संबंधित प्रकार तत्काळ थांबवून पोलिसांना सक्त ताकीद दिले. तसेच कोणत्याही स्वरूपाचे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, वाहतूक पोलिसांकडून गैरप्रकार आढळल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.
दोनपेक्षा जास्त पोलिस चौकात थांबणार नाही
शहरातील महत्त्वाच्या चौकातच दोनपेक्षा जास्त पोलिस कर्मचारी असतील. त्याव्यतिरिक्त इतर ठिकाणी दोनपेक्षा जास्त पोलिस कर्मचाऱ्यांनी चौकांमध्ये थांबू नये. प्रत्येकाने वाहतूक सुरळीत राहील, वाहतुकीचे व्यवस्थित नियमन होईल, याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. रहदारी कमी होईल, वाहतुकीचा ताण कमी असेल, त्याचवेळी पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी.
सिग्नलवरील कारवाई बंद करा
सिग्नल सुरू असताना वाहनांच्या गर्दीत घुसून दुचाकींच्या चाव्या काढून त्या बाजूला घेणे किंवा सिग्नल सुटल्यानंतर धावत जाऊन एखाद्या दुचाकीस्वाराला बाजूला काढण्यासारखे गंभीर प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नसल्याचेही पोलिस उपायुक्त श्रीरामे यांनी स्पष्ट केले. या प्रकारामुळे अपघात होऊन वाहनचालक किंवा पोलिस कर्मचाऱ्याच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी रहदारीच्यावेळी वाहतूक नियमनाला प्राधान्य द्यावे. सिग्नलला अडथळा येणार नाही, नागरिकांना त्रास होणार नाही, याची पुरेपुर खबरदारी घ्यावी, असेही श्रीरामे यांनी स्पष्ट केले आहे.
वाहतूक पोलिसांना रहदारीच्या वेळी वाहतूक नियमनावर लक्ष देण्यास सांगितले आहे. दुपारच्यावेळी उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. ‘टोइंग व्हॅन’वरील कामगारांचीही चारित्र्य पडताळणी केली आहे. पोलिसांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे, कोणत्याही प्रकारचे वाद टाळावेत, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच पोलिसांना सूचना केल्यानंतरही त्यांनी त्याचे पालन केले नाही, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
- राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा
वाहतूक पोलिसांना सूचना
वाहतूक नियमनाला प्राधान्य द्या
वाहनचालकांशी गैरवर्तणूक करू नका
नागरिकांशी वाद घालण्याचे प्रकार टाळावेत
वादाचे प्रसंग घडण्याची शक्यता असल्यास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सांगावे
सिग्नलवर वाहनांच्या चाव्या काढणे, धावत्या वाहनामागे पळणे थांबवा
‘टोइंग व्हॅन’वरील कामगारांनी वाहनचालकांशी गैरप्रकार करू नयेत
पोलिसांशी हुज्जत घालून पळणाऱ्यांची छायाचित्रे घेऊन कायदेशीर कारवाई करावी
कामगारांची चारित्र्य पडताळणी
‘टोइंग व्हॅन’वरील वाहने उचलणाऱ्या कंपनीच्या कंत्राटी कामगारांकडून नागरिकांना अरेरावी, शिवीगाळ केल्याचे प्रकार घडत आहेत. संबंधित कामगारच ‘पोलिस’ बनून वाहनचालकांकडून ‘वसुली’चे काम करीत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यातच काही कामगारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचाही प्रकार पुढे आला होता. याविषयी नागरिकांनी केलेल्या तक्रारी ‘सकाळ’द्वारे मांडण्यात आल्या. याची वाहतूक शाखेने गांभीर्याने दखल घेत वाहतूक शाखेकडील कंत्राटी कामगारांवर कुठल्या प्रकारचे गुन्हे नाहीत ना, याची तपासणी करण्यात आली. संबंधित सर्व कामगारांची तातडीने चारित्र्य पडताळणी करून घेण्यात आली. त्यांच्याकडून वाहनचालकांशी कुठलाही गैरप्रकार घडणार नाही, यादृष्टीने त्यांना सांगण्यात आल्याचेही श्रीरामे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.