har har mahadev movie  sakal
पुणे

बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांचा ‘हर हर महादेव’ चित्रपटावर आक्षेप

‘हर हर महादेव’ या चित्रपटात दाखवलेल्या अनेक घटनांना ऐतिहासिक संदर्भ नाहीत. त्यामुळे यात त्रुटी आहेत, असे सांगत चित्रपटावर बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी आक्षेप घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

‘हर हर महादेव’ या चित्रपटात दाखवलेल्या अनेक घटनांना ऐतिहासिक संदर्भ नाहीत. त्यामुळे यात त्रुटी आहेत, असे सांगत चित्रपटावर बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी आक्षेप घेतला आहे.

पुणे - ‘हर हर महादेव’ या चित्रपटात दाखवलेल्या अनेक घटनांना ऐतिहासिक संदर्भ नाहीत. त्यामुळे यात त्रुटी आहेत, असे सांगत चित्रपटावर बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी आक्षेप घेतला आहे. बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज प्राध्यापक रुपाली देशपांडे, अमर देशपांडे, किरण देशपांडे आदींनी बुधवारी पत्रकार परिषदेत हे आक्षेप नोंदवले.

रुपाली देशपांडे म्हणाल्या, ‘सिनेमॅटिक लिबर्टी याचा अर्थ इतिहास बदलणे, असा नक्कीच होत नाही, तसेच ऐतिहासिक घटनांचा क्रम बदलणे अनुचित आहे. दुर्दैवाने, ‘हर हर महादेव’ या चित्रपटात अनेक ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या घटना दाखवलेल्या आहेत. प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपट दाखवावा, अशी आम्ही या चित्रपटातील कलाकार सुबोध भावे यांना विनंती केली होती. परंतु, तसे झाले नाही. चित्रपटाला आमचा विरोध नाही, परंतु यातील काही दृश्यांबद्दल आम्हाला आक्षेप आहेत. याबाबत कायदेशीर अर्ज पाठवला असून आम्ही चित्रपटाच्या निर्मात्यांना संवाद साधणार आहोत. संवादाने प्रश्न सुटला नाही तर कारवाई करण्याचा विचार करू.’

बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी नोंदवलेले आक्षेप -

- बाजीप्रभू देशपांडे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत असल्याचे दाखवले आहे, हे खटकणारे आहे.

- शिरवळ येथे समुद्र असल्याचे दाखवले आहे, मात्र तेथे नदी आहे. तिथे त्याकाळी इंग्रजांचे प्राबल्य देखील नव्हते.

- बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे या भावंडांमधील लहानपणीच्या कटू प्रसंगांनाही कोणताही ऐतिहासिक आधार नाही.

- अफजलखानाच्या वधाप्रसंगी बाजीप्रभू देशपांडे हजर असल्याचे चित्रपटात दाखवले आहे, मात्र वास्तविक तेव्हा बाजीप्रभू तेथे नव्हते.

- बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख यांच्यात भलत्याच कारणावरून वाद झाल्याचे दाखवण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT