बंगळूर : देशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीमेवरील धोके शोधून त्याची ओळख पटविण्यासाठी भारतीय सैन्यदलाच्या एका अधिकाऱ्याने भन्नाट सॉफ्टवेअर तयार केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तावरील 'अग्नी -डी' असे या सॉफ्टवेअरचे नाव आहे.
सैन्यदलातील इलेक्ट्रिकल अभियंता कॅप्टन विकास त्रिपाठी यांनी ही कामगिरी केली आहे. एरो इंडियामध्ये त्यांचे हे सॉफ्टवेअर प्रणालीचे प्रदर्शन करण्यात आले आहे. याबाबत कॅप्टन त्रिपाठी यांनी सांगितले, "देशाच्या सीमा भागात, विशेषतः संवेदनशील क्षेत्रात ड्रोन, विस्फोटक, शस्त्रास्त्रे, दहशतवादी, ट्रक, चिलखती वाहने अशा
विविध प्रकारच्या धोक्यांचा शोध लावणे किंवा त्यांची ओळख पटविण्यासाठी अनेक उपकरणांचा वापर केला जातो. या उपकरणांना हाताळण्यासाठी देखील मनुष्यबळाची आवश्यकता असते. दरम्यान हा मनुष्यबळ तसेच सर्व पाळत ठेवणे केंद्रे स्वयंचलित करण्याच्या उद्देशाने वाचवियासाठी 'अग्नी-डी' हे सॉफ्टवेअर तयार केले."
सुरुवातीला ह मॉडेल तयार करण्यासाठी, तसेच त्याची यशस्वीरित्या चाचणी याकरिता ७ महिन्यांचा कालावधी लागला. दरम्यान आता एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत नवीन मॉडेल तयार केले जाऊ शकते, जे ८० विविध प्रकारच्या धोक्यांना शोधण्यासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या उत्तर सीमेवरील फॉरवर्ड पोस्ट्सवर पाळत ठेवणे आणि दहशतवादी घुसखोरीला आळा घालण्यासाठी 'अग्नी-डी'ची चाचणी सुरू आहे. कृत्रिम बुद्धिमत्ताला समर्थित वातावरण तयार करण्यासाठी लवकरच ही प्रणाली इतर ठिकाणी वापरली जाईल.
- कॅप्टन विकास त्रिपाठी
नागरी डोमेनसाठी ही उपयुक्त :
या सॉफ्टवेअरचा वापर नागरी डोमेन साठी ही केला जाऊ शकतो. त्यामध्ये पर्जन्य संचयन प्रणाली (रेन वॉटर हार्वेस्टिंग), रस्त्यांची दुरवस्था, पृष्ठभागाच्या नुकसानीचे मूल्यांकन- संवाद, जंगलातील आग शोधणे आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर याचा वापर संशोधनासाठी ही केला जाऊ शकतो.
'अग्नी-डी'ची वैशिष्ट्ये :
- यामध्ये ऑब्जेक्ट डिटेक्शन अल्गोरिदमचा वापर
- कोणत्याही हाय-एंड संगणकीय प्रणालीवर या सॉफ्टवेअरला वापरले जाऊ शकते
- लाईव्ह किंवा आर्काइव्हल अशा दोन्ही डेटावर काम करण्याचा पर्याय
- हे ऑनलाइन आणि ऑफलाइन मोडमध्ये कार्य करू शकते
- त्वरित धोका ओळखून कोणत्याही ठिकाणी रिमोट सूचनाद्वारे माहिती देण्याचे वैशिष्ट्य
- प्लग आणि प्ले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सॉफ्टवेअर, ज्यासाठी पूर्व-कॉन्फिगरेशन किंवा प्रदीर्घ प्रशिक्षणाची आवश्यकता नाही
- या सॉफ्टवेअरची सुमारे ९८.४ टक्के अचूकता
- ८० विविध प्रकारचे धोके ओळखण्याची क्षमता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.