ajji.jpg 
पुणे

मुळशीकरांच्या नात्याचा गावरान गोडवा...कोरोनाला हरविलेल्या सासूचं जंगी स्वागत, सून भावुक, व्हायरल व्हिडिओ पाहून पाणावल्या डोळ्यांच्या कडा...

गोरख माझिरे

कोळवण ता. २६: कोरोनाला घाबरु नका, असं आवाहन सगळेच अधिकारी करत असताना अनेक वृद्धांच्या मनात कोरोनाविषयी मनात भीतीचं वातावरण आहे. कोरोनामुळे आजकाल सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. वयोवृध्द माणसं कोरोनामुळे मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण जास्त आहे. मात्र भीतीला चुटकीसरशी दूर करत मुळशी तालुक्यातील भुकुम येथील  आजीबाईंनी एक संदेश समाजाला दिलाय. या ८७ व्या वर्षी रक्तदाब मधुमेह असुनही आजीबाईंनी कोरोनावर यशस्वी मात करत, दोन हात करता येऊ शकतात हे दाखवून दिलंय. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

भुकुम येथील पै. गोविंद आंग्रे यांच्या मातोश्री श्रीमती हिराबाई पंढरीनाथ आंग्रे यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब यांचा आधीपासुनच त्रास होता. त्यांना अचानक सर्दी, ताप, खोकला यांची लक्षणे दिसुन आली. एक्स-रेमधून न्युमोनिआ असल्याचे निदान झाले. ताप उतरला नसल्याने आणि अशक्तपणा वाढल्याने कुटुंबातील लोकांनी खासगी लॅबमधून त्यांची चाचणी केली. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. घरातील सर्वांचे आहवाल निगेटिव्ह होते. तेव्हा काय करावे, हा एकच प्रश्न या कुटुंबासमोर होता. भूगाव येथील युनिक हाॅस्पिटलचे डाॅ. जयंत इनामदार यांच्या सल्ल्याने घरीच आयसोलेशन करुन उपचार करण्याचे ठरविले. घरात आॅक्सिजनचीही सोय उपलब्ध केली होती. उपचाराला त्या सकारात्मक प्रतिसाद देत होत्या, परंतु त्रास अधिक वाढल्याने त्यांना सिम्बोयसिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांना ऑक्सिजनही लावण्यात आला होता. उपचाराला त्यांनी प्रतीसाद देत अकरा दिवसांत ठणठणीत बऱ्या होऊन त्यांना घरी सोडण्यात आले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या आजी घरी आल्यावर मुलगा पै. गोविंद आंग्रे, माजी सरपंच उमेश आंग्रे यांनी आधार देत घरी आणले. त्यांच्या नाती साक्षी, सायली नातू सोहम यांनी फुलांच्या पायघड्या घालुन स्वागत केले. त्यांची सुन निर्मला यांनी त्यांचे औक्षण करुन हार घालण्यात आला. यावेळी सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तराळत होते. भाऊक होऊन सुनेने यांनी मिठीच मारली. ही व्हिडीओ पाहताना आपल्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही. 

आईची तब्येत खुपच नाजुक असताना त्यांनी उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत ठणठणित बऱ्या झाल्या. या सर्व काळामध्ये युनिक हॉस्पिटलचे डॉक्टर जयंत इनामदार(खोरे) तसेच सिम्बोयसिस येथील डाॅक्टर, नर्स यांचे लाख मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. असे पै. गोविंद आंग्रे यांनी सांगितले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रक्तदाब, मधुमेह असताना आजींनी कोरोनावर मात केली ही खूप आशादायी गोष्ट आहे. वृद्धांसाठी कोरोना धोकादायक असल्याचे बोलले जाते मात्र आपल्या आजींनी कोरोनावर सहज मात करता येऊ शकते हे दाखवून दिले आहे. कोरोना वेळीच निष्पन्न झाल्याने आज संपूर्ण कुटुंब सुरक्षीत आहे. त्यामुळे नागरीकांनी न घाबरता कुणाला जर तीन दिवस ताप असेल तर त्याची माहिती लगेच प्रशासनाला द्यावी. तसेच कुणीही माहिती लपवू नये. वेळीच निदान होऊन जर उपचार मिळाले तर कोरोनावर सहज मात करता येऊ शकते . 
- डॉ. जयंत खोरे-इनामदार(युनिक हाॅस्पिटल)

(Edited by : sharayu kakade)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT